जनसुरक्षा उपक्रम : सायकलने करतात रात्रीला गस्त, युवकांचा समावेशलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येथील पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने व सामाजिक संघटनेत्या सहकायार्ने जनसुरक्षा सप्ताह साजरा होत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांच्या संकल्पनेतून व नागरिकांत्या सहकार्यातून नागरिकांची सुरक्षा व मालमत्तेची सुरक्षा व्हावी या उद्देशाने ही उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी विक्रम साळी यांनी सांगीतले. काही दिवसापांसुन रात्री सायकलने पोलीस सहकार्यांसोबत संपूर्ण शहरात गस्त घालत आहेत. सायकलने गस्त घातल्याने बारकाईने पाहणी होते. सर्विकडे लक्ष घातली जाते, म्हणून सायकवर सर्व कर्मचारी स्वार होवून संपूर्ण गावाला गस्त घालतात.परंतू पोलिसांनीच गस्त घालुन सुरक्षा करण्याऐवजी नागरिकांनी नागरीकांची सुरक्षा केली तर एक जबाबदारी समजून येते. म्हणुन सामाजिक क्षेत्रात अग्रसर जेसीआय च्या कार्यकर्त्यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. मंगळवारला जेसीआयचे सर्व कार्यकर्ते स्वत:ची सायकल घेवुन पोलिसांच्या सोबत रात्री गस्तावर निघाले. आणि पूर्ण सहकार्य केले याबाबत साळी यांनी त्यांची प्रशंषा केली व ईतरही सामाजिक संघटनांनी असे सहकार्य करण्याचे आव्हान विक्रम साळी यांनी केले.
पोलिसांच्या गस्तीला जेसीआयची साथ
By admin | Published: June 01, 2017 12:31 AM