तुमसर : एसटी बसच्या प्रवासात महिलांचे मंगळसूत्र उडविणारी टोळी तुमसर तालुक्यात सक्रीय झाल्याचे दिसत असून रविवारी देव्हाडी बसस्थानकावरुन एका महिलेच्या मंगळसुत्रासह दागिने लंपास करण्याची घटना घडली. तीन दिवसांपूर्वी तुमसर बसस्थानकावरुन महिलेचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले होते.
नाकाडोंगरी येथील पूजा मिलिंद उके गोंदिया येथे जाण्यासाठी तुमसर बसस्थानकावर आले. तेथून गोंदिया जाणाऱ्या बसमध्ये बसली. देव्हाडी गावाजवळ तिकीट काढण्यासाठी पर्समध्ये बघितले असता त्यातील दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले. चोरट्याने तीन ग्राम पदक आणि २४ मणी असलेले मंगळसूत्र, तीन ग्राम वजनाची सोन्याची नथ, तोरड्या असा २८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तीन दिवसांपुर्वी मुलीच्या गावी जाणाऱ्या एका महिलेचे मंगळसूत्र तुमसर बसस्थानकावरुन चोरीस जाण्याची घटना घडली होती.