लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे विदर्भाचा महत्वाकांक्षी भेल प्रकल्प सहा वर्षापासून बंद पडलेला आहे. दोन हजार ७०० कोटी रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडे बंदिस्त आहे. याचा निषेध करण्यासाठी रविवारला भेल प्रकल्पासमोर सामाजिक कार्यकर्ते सुहास फुंडे यांच्या नेतृत्वात मुंडीपार, ब्राम्हणी व खैरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी व बेरोजगार यांनी झोपा आंदोलन केले. भेल प्रकल्प एक महिन्यात सुरु झाला नाही तर पुन्हा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.सुहास फुंडे पुढे म्हणाले, विदर्भाचा महत्वाकांक्षी भेल प्रकल्प लोकप्रतिनिधीच्या राजकीय वर्चस्वाच्या संघर्षामुळे सहा वर्षापासून बंद पडलेला आहे. तत्कालीन अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने भेल प्रकल्पाची पायाभरणी करुन थाटात उद्घाटन करण्यात आले. भेल प्रकल्पावर सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र त्यानंतर काहीच झाले नाही.परिसरातील बेरोजगार व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना वाऱ्यावर सोडले. केंद्र सरकारकडे दोन हजार ७०० करोड रुपयांचे अनुदान सौर उर्जा प्लांटकरिता मंजूर झाले आहे हे अनुदान आज भेल प्रकल्पाला स्थानांतरीत करण्यात आले. तर उद्या सौर उर्जा प्लांटचा प्रकल्प सुरु होण्यास वेळ लागणार नाही. यासंदर्भात विद्यमान लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.साकोलीचे तहसीलदार तेढे यांनी आंदोलन स्थळी जावुन सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून निवेदन स्विकारले. आंदोलन कर्त्यांनी निषेधात्मक घोषणा दिल्या. प्रशासनाने हे काही अप्रिय घटना होऊ नये याकरिता पोलीस बंदोबस्त लावला होता.
‘भेल’ बंदच्या विरोधात ‘झोपा’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 1:03 AM
लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे विदर्भाचा महत्वाकांक्षी भेल प्रकल्प सहा वर्षापासून बंद पडलेला आहे. दोन हजार ७०० कोटी रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडे बंदिस्त आहे. याचा निषेध करण्यासाठी रविवारला भेल प्रकल्पासमोर सामाजिक कार्यकर्ते सुहास फुंडे यांच्या नेतृत्वात मुंडीपार, ब्राम्हणी व खैरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी व बेरोजगार यांनी झोपा आंदोलन केले.
ठळक मुद्देशेकडो नागरिकांचा सहभाग : मुंडीपार येथील बंद भेल कारखान्यासमोर आंदोलन