मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मुंबईत अंधेरी व एलफिस्टन रेल्वे स्थानकवरील जुना पूल पावसाळ्यात कोसळला ही घटना ताजी आहे. मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर माडगी (दे) शिवारात वैनगंगा नदीवर शंभरी गाठलेला ब्रिटीशकालीन पूल आहे. त्या पूलाच्या समांतर डाऊन रेल्वे मार्गावर भारतीयांनी बांधकाम केलेल्या पुलाला सुध्दा ६० ते ६५ वर्षे झाली आहेत. सदर दोन्ही पुलांचे स्ट्रक्टचरल आॅडीट झाल्याची माहिती आहे, पंरतु पूल परिसरातील रेती उपस्यामुळे तथा पुलाच्या आयुष्याच्या पूर्वाधात सतर्कतेची गरज आहे.माडगी (दे) शिवारात वैनगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. ब्रिटीशांनी रेल्वे वाहतूकीकरिता दगडी रेल्वेपुलाचे बांधकाम सुमारे शंभर वर्षापुर्वी केले होते. त्यावेळी बंगाल - नागपूर अशी सेवा सुरु होती. सन १९०० मध्ये रेल्वेचे जाळे हावडापर्यंत वाढविण्यात आले होते. स्थापत्य केलेल्या हा पूल उत्कृष्ठ नमूना म्हणून ब्रिटीशांनी नोंद केली आहे. सदर पूल तयार करतांनी इंग्रजांच्या स्थापत्य कलेची येथे कसोटी लागली होती. दगड, चुना व चुनखडीच्या मिश्रनाने हा पूल तयार केला आहे. या पूलाखालून अनेक पूर वाहून गेले हे विशेष.मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर सध्या २४ तासात १८० ते २०० प्रवाशी व मालगाड्या धावतात. दररोज हा क्रम सुरु आहे. त्यामुळे पूलाच्या आयुष्यावर शंका घेतली जाणे ही क्रमप्राप्त ठरते. पूलाचे आयुष्य ब्रिटीशांनी सव्वाशे वर्षे ठरविल्याची माहिती अधिकारी खासगीत सांगतात. पूलाच्या नोदंी रेल्वे मुख्यालयात असल्याची माहिती आहे. ब्रिटीशकालीन पूलाला समांतर भारतीयांनी दुसरा पुल ६० ते ६५ वर्षापुर्वी तयार केल्या आहे.दोन्ही पूलांची देखभाल व डागडूजी नियमित रेल्वे विभाग करीत आहे. जुना पूल अपघातानंतर या पुलाची चर्चा केली जाते. प्रवाशी व मालगाड्या पूलावरुन पावसाळ्यात जातांनी त्यांचा वेग खूप कमी केलाजातो. रेल्व ेती खबरदारी होते. रेल्वेचे अभियंते येथे पुलाची पाहणी करुन नेहमीच जातात. दोन्ही पुलाजवळ रेतीचा भराव नाही. केवळ दगड दिसतात. पूलावरुन गाड्या जातांनी पुलात मोठे कंपन होते. यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरवर्षी पावसाळ्यात ऐन पुरात रेल्वेगाड्या धावतांनी सर्वांच्या मनात मात्र धडकी भरते हे विशेष. ऐरवी धडधड करीत जाणाºया रेल्वेगाड्या पावसाळ्यात मात्र संथगतीने पुलावरुन जातात.रेल्वेने पुलाचा स्ट्रक्चरल आॅडीट जरी केला असला तरी रेल्वेगाडयांची संख्या पाहता तज्ञ स्थापत्या अभियंत्याकडून तपासण्ीा करणे गरजेचे आहे. स्ट्रक्चरल आॅडीट तर मुंबई येथील पुलाचा सुध्दा झाला होता. केवळ पाऊसामुळे तो कोसळला. माडगी येथील पुल तर शंभर वर्षापासून नदीच्या पाण्यात उभा आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ.पंकज कारेमोरे, काँग्रेस नेते तुमसर.धडधड करीत जाणाऱ्या रेल्वेगाड्या पावसाळ्यात अगदी संथगतीने पुढे सरकतात. नदीचा प्रवाह येथे जोरात असतो. पाणी पूलाच्या खांबावर आदळतो. खांबाजवळ रेती नाही. खांब सताड उघडे पडले ओत. पुलाची केवळ वरुन डागडुजी केली जाते. १०० वर्षाच्या जुन्या पूलाकडे विशेष लक्ष रेल्वेने द्यावे- विपील कुंभारे, माडगी ,
शंभरी गाठलेल्या रेल्वे पुलावरून रेल्वे गाड्यांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 9:46 PM
मुंबईत अंधेरी व एलफिस्टन रेल्वे स्थानकवरील जुना पूल पावसाळ्यात कोसळला ही घटना ताजी आहे. मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर माडगी (दे) शिवारात वैनगंगा नदीवर शंभरी गाठलेला ब्रिटीशकालीन पूल आहे.
ठळक मुद्देमाडगी शिवारातील पूल : स्ट्रक्चरल आॅडिट झाला, मुंबई पूल अपघातानंतर रेल्वे सतर्क