लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : वैनगंगा मानवता सेवा संघ लाखनी व कोंढा गावकरी यांच्यातर्फे गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, कोंढा येथे आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय जेष्ठांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. आनंद जिभकाटे होते. अतिथी म्हणून बे.तू. आगाशे, अध्यक्ष मानवसेवा संघ लाखनी, संयोजक ए.भ. पाखमोडे, कार्याध्यक्षता ह. भुरे, सचिव झा. म. नेवारे, सहसचिव ह.रा. मोहतुरे, स्रेही मित्रमंडळाचे अध्यक्ष प्र. सी. सोनवाने, प्रार्चा सुरेश जिभकाटे यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी भंडारा राजकीय व सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करून आपला वेगळा ठसा उमटविणारे सामाजिक कार्यकर्ते ललीतकुमार थानथराटे तुमसर, माजी नगराध्यक्ष रामदास शहारे भंडारा, माजी जि.प. उपाध्यक्ष पंढरी सावरबांधे कोंढा, सामाजिक कार्यकर्त्या मायाबाई मोटघरे, विरली खंदार, सेवानिवृत्त शिक्षक नामदेव शेंडे जांभोरा, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सीताराम दोनोडे मासळ, सेवानिवृत्त नौसेना अधिकारी विजय भुते लाखनी, माधव येळेकर उसगाव चांदोरी, वसंता भुरे कोसरा यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचन्ह देऊन अॅड. आनंद जिभकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. जिभकाटे यांनी या सर्व मान्यवरांनी जिवनात एक ध्येय ठरवून समाजाची सेवा केली. यासाठी कठोर परीश्रम घेतले. समाज घडल तर राष्ट्र घडेल हे तत्व ठेवणाºया या सर्वांना मानाचा मुजरा देतो, असे सांगितले, असे कर्तूत्वान व्यक्तीची आज गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक एस.जी. गोरले यांनी अहवाल वाचन संयोजक ए.भ. पाखमोडे यांनी केले. संचालन दिनेश पंचबुद्धे व आभार पु.वा. सपाटे यांनी केले. कार्यक्रमासाठी गांधी विद्यालय येथील शिक्षक, विद्यार्थी मानवता सेवा संघ, लाखनीच्या सदस्यांनी सहकार्य केले.
कोंढा येथे ज्येष्ठांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 10:15 PM