मॉर्निंग वॉक ग्रुपचा उपक्रम : निरोगी आरोग्यासाठी तुमसरकरांचा संकल्प तुमसर : आपले शहर, स्वच्छ शहर अंतर्गत तुमसरातील मॉर्निंग वॉक ग्रुपमधील ज्येष्ठ नागरिक व महिला संपूर्ण भंडारा रोड परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प घेतला आहे. कचरा गोळा करणे व जाळणे असा अभिनव उपक्रम त्यांनी घेतला आहे. शेकडो हात स्वच्छतेकरिता पुढे सरसावल्यामुळे हा परिसर स्वच्छ झाला आहे.संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला स्वच्छतेचा मंत्र पुढे नेण्याची गरज समाजातील प्रत्येकाची आहे. निरोगी आरोग्याकरिता तुमसर शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला दररोज कृषी उत्पन्न बाजार समिती व त्याही पुढे पंचायत समितीपर्यंत जातात. या रस्त्यावर कागद, प्लास्टीक पिशव्या व इतर निरुपयोगी कचरा सताड पडला राहायचा.या ज्येष्ठांनी या रस्त्यावर दररोज फेरफटका मारताना हा रस्ता स्वच्छ करावा असे वाटले. सर्वांनी होकार दिला व शेकडो हात हातात खराटे व इतर साहित्य घेऊन पुढे सरसावले. पाहता - पाहता संपूर्ण परिसर स्वच्छ होत गेला. आता नित्यनियमाने ज्येष्ठ नागरिक व महिला आपले तुमसर, स्वच्छ तुमसर याचा वसा पुढे चालू ठेवण्याचा संकल्प घेतला आहे.या उपक्रमात यादोराव गायधने, सुधाकर कारेमोरे, दखणे, पोटदुखे, अनंतलाल दमाहे, पटले, मधुकर बोळणे, मेघश्याम तलमले, अॅड.दिलीप तिमांडे, पप्पू पालीवाल, गोपाळराव ठवकर, कुथे, राजू माटे, मिश्रा, वरखडे, अशोक तलमले, प्राचार्य राजाभोज, फुलबांधे, संगीता खोबरागडे, कल्पना लक्केवार, उर्मिला सार्वे, सविता ठाकुर, आशा पुप्पलवार, माधुरी ठाकरे, अनिता कडव, किरण पटले, रुपा वंजारी, शकुंतला साठवणे, आशा सार्वे, सुशिला लांजे, उषा गडरिया, मनिषा चौधरी, सुनिता तडगुळे, कला उपासे, तारा पारधी, दुर्गा येवले, लिना हरने, कांती वाजपायी, ललीता गौरेसह ज्येष्ठ महिला, नागरिक सहभागी आहेत. (तालुका प्रतिनिधी)
स्वच्छतेकरिता ज्येष्ठांचे सरसावले हात
By admin | Published: April 12, 2016 12:40 AM