शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

ज्ञानस्पर्धा परीक्षेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:42 PM

निवडणुकीबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी किंबहुना जाणीव जागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाद्वारे आयोजित निवडणूक ज्ञान परीक्षा तहसील कार्यालय मोहाडी यांच्या माध्यमाने घेण्यात आली.

ठळक मुद्दे३०५० विद्यार्थ्यांचा सहभाग : अधिकाºयांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : निवडणुकीबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी किंबहुना जाणीव जागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाद्वारे आयोजित निवडणूक ज्ञान परीक्षा तहसील कार्यालय मोहाडी यांच्या माध्यमाने घेण्यात आली. या स्पर्धा परीक्षेला मोहाडी तालुक्यातून ३०५० इतक्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.आजही गावखेड्यात, शहरातही निवडणुकीसंदर्भात उदासीनता दिसून येते. मतदार म्हणून केवळ मतदान करणे केवळ एवढीच माहिती जनतेला असते. मतदान अन् निवडणूक हे भारताचे मुख्य स्तंभ मानले जातात. त्यासाठी विद्यार्थ्यांना मतदार, निवडणूक याची माहिती व्हावी तसेच विद्यार्थी हा प्रसार व प्रचाराचा माध्यम आहे ही बाब लक्षात घेवून भारत निवडणूक आयोगाद्वारे निवडणूक ज्ञान स्पर्धा घेतली गेली. मोहाडी तालुक्यातून ३०५० एवढे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.ही परीक्षा इयत्ता नववी व अकरावी इयत्तेत शिकणाºया विद्यार्थ्यांनी दिली. परीक्षेदरम्यान नायब तहसीलदार नवनाथ कातकडे, गटशिक्षणाधिकारी, रमेश गाढवे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर गभणे यांनी महात्मा ज्योतीबा फुले हायस्कुल मोहगाव देवी, जिल्हा परिषद हायस्कुल मोहाडी आदी शाळांना भेटी दिल्या होत्या. निवडणूक ज्ञान स्पर्धा ४५ मिनिटाची घेण्यात आली. ३० बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले होते. शाळांना विद्यार्थी संख्येंबाबत स्पष्ट सुचना नव्हत्या. प्रश्नपत्रिका हव्या तेवढया देण्यात आल्या नाहीत.एका शाळेला एक प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. जेवढे विद्यार्थी बसतील तेवढया झेरॉक्स काढण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले. तथापि, झेरॉक्स केलेल्या प्रश्नपत्रिकांचे बील मिळणार या अटीवर मुख्याध्यापकांनी झेराक्स काढले. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनअभावी ही स्पर्धा केवळ औपचारिक ठरली असल्याची शिक्षकांमध्ये चर्चा आहे. निवडणूकीसंबंधी ज्ञानात भर पडतील असे प्रश्न विचारले गेले होते. कोणता प्राधिकरण निवडणूक जाहीर करतो, मतदार ओळखपत्राचा उपयोग काय, इपीआयसी चे इंग्रजी नाव काय, बीएलओचा अर्थ, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आदी प्रश्न विचारले गेले होते.प्रश्न क्रमांक ६,९,१०,१४ मध्ये पर्यायात दोन ठिकाणी ‘क’ होते. तर प्रश्न क्रमांक २१ मध्ये पर्याय दोन ठिकाणी ‘ड’ होते. यामुळे विद्यार्थ्यामध्ये गोंधळ झाला. उत्तरपत्रिका तपासणी करीता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भंडारा यांचेकडून दोन उत्तर पत्रिका पाठविण्यात आल्या होत्या.पहिल्या उत्तर पत्रिकेत चुका असल्या दुसरी उत्तरपत्रिका दुरुस्ती करुन पाठविण्यात आली. निवडणूक ज्ञान स्पर्धेत मूल्यांकन करताना शिक्षकांनी गडबड केल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते. स्पर्धा झाल्यानंतर मूल्यांकन शाळेच्या वतीने करण्यात आले. उत्तरपत्रिकांची सुधारित प्रत दीड तास उशिराने म्हणजे ४.०९ वाजता पाठविण्यात आली. तर परिक्षा २.४५ वाजतापर्यंत घेण्यात आली. पहिली उत्तरपत्रिका चुकीची होती.असे असतानी तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल डोंगरगावच्या शाळेतील दहा विद्यार्थ्यापैकी दहाही विद्यार्थ्यांना ३० पैकी ३० गुण पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच जि.प. हायस्कूल वरठी येथे ११ पैकी नऊ विद्यार्थ्यांना ३० पैकी २५ गुण दिले गेले. उर्वरित दोन विद्यार्थ्यांना २६ गुण देण्यात आले. बºयाच शाळांमध्ये मूल्यांकन करताना घोळ झाला.