ठळक मुद्दे३० ट्रॅक्टर्स सहभागी
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बदलत्या जगानुसार आपल्या रितीभातीही बदलत असल्याचे आपण पाहतो. याचा एक वेगळा अनुभव शुक्रवारी सकाळी भंडारा जिल्ह्यातील पवनी गावातील गावकऱ्यांना आला. पोळा या कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकाचे ऋण मानण्याचा सण. पण आता बैलांची संख्याच दिवसेंदिवस घटत जाते आहे. त्याजागी ट्रॅक्टर दिसू लागले आहेत. पवनीकरांनी पोळ्याचे निमित्त साधत, बैलांसोबत ट्रॅक्टर्सचीही पूजा आज बांधली.शेती कामात अविभाज्य घटक असलेल्या ट्रॅक्टर्सला छान सजवून गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी सजलेले हे ट्रॅक्टर्स एकत्र जमले होते. यात ३० ट्रॅक्टर्स सहभागी झाले. हा आगळावेगळा पोळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपली हजेरी लावली.