भंडारा : काेराेना संसर्गाचा भंडारा जिल्ह्यात उद्रेक झाला तेव्हा प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काेराेना निर्मूलनासाठी उपक्रम हाती घेतले. आमदार विकास निधीतून ३५ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला दिले. १७३ गावांमध्ये सॅनिटायझर मशीनचे वितरण केले. भंडारा आणि पवनी तालुक्यात ३६ रक्तदान शिबिर घेऊन ११०० पिशव्यांचे रक्तसंकलन केले. लाॅकडाऊनच्या काळात ५० हजार धान्य किटचे वितरण केले. काेराेना संकटात जनसेवा हीच ईश्वरसेवा समजून कार्य केले असे प्रतिपादन आमदार नरेंद्र भाेंडेकर यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.
काेराेना संकटात प्रत्येक क्षेत्रातील नागरिक आपल्या शक्तीप्रमाणे याेगदान देत आहे. काेराेना याेद्धयांच्या भरीव याेगदानामुळे महामारीची लाट थाेपविण्यात आली. यात राजकीय नेत्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली. भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भाेंडेकर यांचे या काळातील कार्य उल्लेखनीय आहे. आमदार भाेंडेकर म्हणाले, वाढदिवसाचे औचित्य साधून समाजासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काेराेनाने कुटुंब प्रमुख गमावलेल्या कुटुंबातील मुलांना दत्तक घेऊन त्यांचे दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्धार केला आहे. गतवर्षी काेराेनाच्या पहिल्या लाटेत गाेरगरीब जनतेला अन्नधान्याच्या किट वितरित केल्या. त्यामुळे उपासमारीची वेळ टाळता आली. अर्थात हे माझे सामाजिक दायित्व आहे, असे त्यांनी सांगितले.
काेराेना संसर्ग ग्रामीण भागातही वेगाने वाढत हाेता. सुरक्षा साधनांचा अभाव दिसत हाेता. ही बाब लक्षात येताच भंडारा आणि पवनी तालुक्यातील १३५ गावात सॅनिटायझर मशीन दिले. काेराेना रुग्णांची सेवा करण्यासाठी डाॅक्टरांना पीपीई किट, सॅनिटायझर, तापमापक मशीन, हातमाेजे आदी साहित्य खरेदीसाठी १५ लाख रुपये दिले. असे आमदार भाेंडेकर यांनी सांगितले.
बाॅक्स
अद्यावत रुग्णवाहिका मिळविण्यासाठी नियाेजन
भंडारा विधानसभा क्षेत्रातील नऊ प्राथमिक आराेग्य केंद्र, पवनी येथील उपजिल्हा रुग्णालय, अड्याळचे ग्रामीण रुग्णालय येथे स्वतंत्र रुग्णवाहिका मिळवून देण्यासाठी नियाेजन सुरु आहे. यासाेबतच अत्यल्प मानधनात काेराेना याेद्धा म्हणून काम करणाऱ्या आशा वर्करला छत्री, डायरी, पेन अशी अल्पशी भेटवस्तू देऊन सन्मानित करण्याची याेजना आहे.
मतदार संघात गाेदाम उभारण्याला प्राधान्य
भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. सध्या गाेदामाअभावी धान खरेदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर उपाय म्हणून शक्य तितके गाेदाम मतदार संघात उभारण्याची याेजना आहे. यासाेबतच ३४ ग्रामपंचायत क्षेत्रात व्यायाम शाळा, वाचनालयाच्या इमारती उभारल्या आहेत. यासाेबतच तरुण व महिलांना व्यवसाय उपलब्ध करुन देण्यासाठी भाजीपाला व धान्याची बाजारपेठ उभारण्याचे नियाेजन आहे. महिला रुग्णालय, पवनी येथील उपजिल्हा रुग्णालय, सांगाेरी, भंडारा, धारगाव उपसा सिंचन याेजना पूर्ण करायच्या आहे. भंडारा व पवनी शहरात भुयारी गटार याेजनेसाठीही प्रयत्न केले जात असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त इमारतीचे कामही लवकरच हाती घेण्यात येईल.