शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

काटेखाये, भेंडारकर, धुर्वे, शिवणकर, हलमारे विजयी

By admin | Published: June 27, 2016 12:32 AM

सहकार क्षेत्रातील जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक रविवारी मिशन हायस्कूलमध्ये पार पडली

निवडणूक दुग्ध संघाची : आता नजरा अध्यक्ष निवडीकडेभंडारा : सहकार क्षेत्रातील जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक रविवारी मिशन हायस्कूलमध्ये पार पडली. निवडणुकीत यापूर्वी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात संचालक अविरोध निवडून आले होते. यात रामलाल चौधरी, विनायक बुरडे, सदाशिव वलथरे, आशिष पातरे, लक्ष्मीकांत सेलोकर, महेंद्र गडकरी, राम गाजीमवार या सदस्यांचा समावेश होता़ दोन महिला संचालक पदासाठी तीन महिला रिंगणात होत्या.ज्यामध्ये महिला प्रवर्गातून रिता हलमारे यांनी १९२ व अनिता साठवणे यांनी १८८ मत प्राप्त केले़ सेलोकर या निवडणुकीतून माघार घेतली होती. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अध्यक्ष विलास काटेखाये हे पवनी तालुक्यातून रिंगणात होते. निवणडूकीत त्यांना ३४ मत प्राप्त झाले असून त्यांचाच या निवडणुकीत वर्चस्व राहिले. त्यांचे प्रतिस्पर्धी हिरालाल खोब्रागडे यांना मात्र ३ मत प्राप्त झाले़ त्याचप्रकारे लाखांदुर तालुक्यातून गोपीचंद भेंडारकर व संतोष शिवणकर आमोरासमोर होते. यात शिवणकर यांना ९ व भेंडारकर यांना ७ मत प्राप्त झाले. शिवणकर यांना विजयी घोषित करण्यात आले. ओबीसी प्रवगार्तुन क्रिष्णा अतकरी व नरेश धुर्वे हे एकमेकांविरुद्ध रिंगणात होते. यामध्ये धुर्वे यांना १४३ मत तर अतकरी यांना ७१ मत प्राप्त झाले़ यामध्ये धुर्वे यांचा विजय झाला. महिला प्रवर्गातून रिता हलमारे यांनी १९२ मते घेऊन अनिता साठवणे यांचा चार मतांनी पराभव केला. एकूण १२ सदस्यांपैकी सात सदस्य अविरोध निवडून आल्यामुळे पाच जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली़ आजच्या निवडणूकनंतर सर्वांच्या नजरा आता अध्यक्षांच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत. सहकार क्षेत्रातील मानांकित समजल्या जाणाऱ्या दुग्ध संघाच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (प्रतिनिधी)