अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहन पंचभाई, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित वंजारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये, सुभाष वाडीभस्मे, जिल्हा परिषदचे माजी सभापती राजकपूर राऊत, जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष जयश्री बोरकर, माधुरी कारेमोरे, वैशाली भिवगडे, जिल्हा सरकारी वकील ॲड. अमर चवरे, डॉ. मिलिंद दहीवले, के. एच. पाटील, जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश द्रुरूगकर, पंचायत समिती सदस्य दर्शन भोंदे, सरपंच मोरेश्वर गजभिये, महादेव मेश्राम, माजी सरपंच सूर्यभान गजभिये, समता सैनिक दल अध्यक्ष डी. एफ. कोचे, भीमराव भुरे, शशिकांत मेश्राम, इंजि. रूपचंद मेश्राम, सुजित पंचबुद्धे, गुलशन गजभिये, उपस्थित होते.
सुभाष वाडीभस्मे म्हणाले, महाराष्ट्र संत -महापुरुषांची भूमी आहे. धर्मांचा प्रसार - प्रचार करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिला. याची प्रचीती भीममेळाव्यातून दिसून येते. बहुजनांना जागविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मोलाचा मंत्र दिला. तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या पंचशील तत्त्वाचे पालन केल्यास गाव किंवा किंबहुना विकास साध्य होईल.
आ. अभिजित वंजारी म्हणाले, मी प्रथम या नगरीला आलो, माझे सौभाग्य समजतो की, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे पदस्पर्श लाभले. बाबासाहेबांनी दिलेली शिकवण भारतीयांना प्रेरणादायी आहे. अध्यक्षीय भाषणात मोहन पंचभाई म्हणाले की, डॉ. बाबासाहेब व तथागत गौतम बुद्धांचे विचार घेऊन आपला व आपल्या परिसराचा विकास करावा. अन्याय- अत्याचार यांच्याविरुद्ध लढा देण्यासाठी फक्त लोकशाहीस्वरूपी आंबेडकरांचे विचार फलदायी ठरतात. तत्पूर्वी सकाळी बुद्धविहारातील मूर्तीसमोर प्रभारी ठाणेदार लांबाडे यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलित व ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर होते. पूज्य भिक्खुणी संघप्रिया व संघ यांच्या हस्ते त्रिरत्न वंदना घेण्यात आली. समता सैनिक दलाचे गंगाराम नागदेवे यांच्या हस्ते अल्पोपाहार वितरण करण्यात आले. समता रॅली काढण्यात आली. दुपारी सिनियर सिटीजन मल्टीपर्पज असोसिएशन भंडाराद्वारे बौद्धधर्मीय वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. सायंकाळी ७७ व्या मेळाव्याचे उद्घाटन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. रात्री भिमेश भारती व सीमा खंडागळे आणि संच यांच्या समाजप्रबोधनपर मराठी, हिंदी गीतांचा कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करण्यात आले.
प्रास्ताविक भीम मेळाव्याचे संयोजक सरपंच मोरेश्वर गजभिये यांनी केले. सूत्रसंचालन अमृत बनसोड, संजय गजभिये यांनी केले तर दुर्योधन खोब्रागडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मंगला गजभिये, भाविका गोस्वामी, पुष्पा बेलेकर, सोनल गजभिये,आशा जनबंधू,अपर्णा खोब्रागडे, माया वैद्य, मनोज चवरे, संजय गजभिये, चिंचखेडे गुरुजी, देवेंद्र रामटेके, ऋषभ गजभिये ,अशोक भिवगडे, सचिन बेलेकर, तोताराम मेश्राम, अनिकेत खोब्रागडे, नितेश गजभिये, अनमोल गजभिये यांनी सहकार्य केले.