शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

मूठभर तांदूळ अन् पाण्याची वाटी, अंगणात ठेवा ना माझ्यासाठी

By admin | Published: March 27, 2017 12:34 AM

घरात चिमणी आली तर ‘इंटेरियर’ची वाट लागेल, असेही काही जण म्हणत आहेत.

भंडारा : घरात चिमणी आली तर ‘इंटेरियर’ची वाट लागेल, असेही काही जण म्हणत आहेत. माझी ओली आळवणी एवढीच आहे, मूठभर तांदूळ अन् वाटीभर पाणी... अंगणात ठेवा ना माझ्यासाठी...’’ चिमण्यांची चिमणी पाखरं लहानसहान किटकांवर वाढतात. हे कीटकही जंतूनाशकांच्या वाढत्या वापरामुळे मरत आहेत. कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने त्यावर जगणाऱ्या चिमण्यांना अन्न मिळेनासे झाले अन् त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे चिमण्यांसह एकूणच पक्ष्यांच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होत आहे. शहरात सुरू असलेली प्रचंड वृक्षतोड, शहरीकरणाचा आंधळा वेग चिमण्यांच्या जीवांवर उठला आहे. खरे तर परिसरात जास्तीतजास्त चिमण्यांचे वास्तव्य असले पाहिजे. काँक्रिटच्या जंगलातील वास्तूरचना चिमण्यांसाठी पोषक नाही. जुन्या वह्यांचे पुठ्ठे काढून त्यापासून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करता येतात. ती शाळेच्या परिसरात अन् अंगणात लावता येतात. घर बांधतानाच घरात चिमण्यांसाठी विशिष्ट जागा शिल्लक ठेवता येते. चिमणी हा मनुष्याच्या आसपास राहणारा पक्षी असल्याने त्यांना घराच्या परिसरातच घरट्यासाठी जागा हवी असते. घरटे बांधण्यासाठी योग्य जागा मिळत नाही म्हणून अनेकदा त्या धोक्याच्या ठिकाणी घरटे तयार करतात. त्यामुळे त्यांची अंडी सुरक्षित राहात नाही. योग्य आहाराविना पिल्लांची वाढ योग्यप्रकारे होत नाही. लहानपणी जेवणाचा कंटाळा केला की, आई हमखास दाणा टाकून चिमण्यांना बोलवायची दारात़ मग त्यांचे कौतुक दाखवत एकेक घास भरायची तोंडात़ बालपणी पहिल्यांदा ही अशी ओळख झाली आपली चिऊताईशी! तेव्हापासून ती मनाच्या चौकटीत कायम बसली आहे घरटे करूऩ संगणकाच्या युगातही तिचे आकर्षण कमी झाले असे अजिबात नाही़ परंतु व्यक्तिगत स्वप्ने नक्कीच मोठी झाली अन् या स्वप्नांच्या उंचीशी स्पर्धा आपल्या लाडक्या चिमण्यांना काही करता आली नाही़ याच उंची स्वप्नांनी पुढे त्यांचे घरटेही हिरावून घेतले़ आता तर त्यांना दोन थेंब पाणीही मिळणे दुरापास्त झाले आहे़; म्हणूनच या चिमण्या आपल्याला साद घालत आहेत़ ऐका जरा ती साद अन् आपल्या बालपणाच्या या सोबत्यांना जगविण्यासाठी मूठभर तांदूळ आणि एक पाण्याने भरलेले भांडे ठेवा आपल्या दारात़चिऊताई म्हणते,‘चिल्यापिल्यांना घास भरवताना मी प्रत्येकच मायबापाच्या मदतीला धावून गेली. आज मला तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्ही फटाक्यांच्या आवाजाने मला दिवाळीत बधीर केले. संक्रातीला नायलॉनच्या मांजाने माझा गळा कापला. आता आमच्यावर संक्रांत कशाला आणता? मला माहीत आहे. आता इथली जुनी घरे जात आहेत. सिमेंटचे चकाचक जंगल उभे राहात आहे. (शहर प्रतिनिधी)पक्ष्यांचा कलकलाट झाला दुर्लभजगण्याचा अधिकार फक्त मानवालाच नसून अन्य जीवीतांनाही आहे हे आजघडीला मानव विसरून गेला आहे. त्यामुळेच आपल्या सोयीसाठी दुसऱ्याचा जीव घेण्यास तो मागेपुढे बघत नाही. हेच कारण आहे की आपल्या सोयीसाठी मानवाकडून निसर्गाचा ऱ्हास केला जात असून त्याचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर जाणवत आहे. यात मोठ्या प्राण्यांचे तर ठिक आहे, मात्र इवलीशी चिऊताई बिचारी आपला जीव गमावत आहे. परिणामी चिमणी व अन्य पक्ष्यांचीही संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. हेच कारण आहे की, पक्ष्यांचा किलकिलाट व चिमण्यांची चिवचिव आज कानी पडत असून त्यांचे दर्शनही दुर्लभच झाले आहे. नेमकी हिच बाब हेरून चिऊताईच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.