नाना पटोले : रोहणी येथे पुण्यतिथी महोत्सव लाखांदूर : जीवन जगण्याचा मूलमंत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा आहे. त्या काळातील ग्रामगीतेत आजच्या व्यवस्थेबद्दलसुद्धा तुकडोजी महाराजांच्या दूरदृष्टीचे विचार जीवन जगण्यासाठी आणि गाव व देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रसंतांचे विचार आचरणात आणा, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. लाखांदूर तालुक्यातील रोहणी येथे राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळा काशीवार, नगराध्यक्ष नीलम हुमणे, वामन बेदरे, नरेश खरकाटे, हरीश बगमारे, विनोद ठाकरे, प्रकाश महाराज वाघ, जनार्धनपंत बोथे, प्रा.उरकुडे, दामोधर पाटील, नाना महाराज, डॉ.शिवानाथ कुंभारे, वासेकर सावकार, प्रणाली ठाकरे, मनोहर महावाडे, अल्का मेश्राम, शिवाजी देशकर, पोलीस निरीक्षक देविदास भोयर, दयाराम घोरमोडे, ईश्वर घोरमोडे, पुरूषोत्तम भुर्ले, मुरलीधर मेश्राम, श्रीराम ढोरे, सरपंच हरिहर बेदरे उपस्थित होते. यावेळी आमदार राजेश काशिवार म्हणाले, माणसाला माणूस बनवायचे असेल तर तुकडोजी महाराजांचे सदगुण विचार आचरणात आणावे लागेल, व्यसनाधीन माणूस जर का सदसदविवेकबुद्धीने वागला तर गावाचा व समाजाचा विकास साधेल, ‘माणूस द्या, मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला’ या भजनातून राष्ट्रसंतांंनी समाजाला चांगल्या विचाराच्या व सूज्ञ माणसाची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रसंतांचे विचार आचरणात आणा
By admin | Published: January 05, 2017 12:33 AM