आमदार राजू कारेमोरे यांनी देव्हाडा खुर्द गावापासून जनसंपर्क दौऱ्याला प्रारंभ केला. त्यानंतर देव्हाडा बुज, मोहगाव, नवेगाव, करडी, केसलवाडा, जांभोरा, किसनपूर, निलज खुर्द, निलज बुज आदी गावात पार पडलेल्या जनसंपर्क दौऱ्यात नागरिकांनी भरभरून समस्या व अडचणी मांडल्या. वैयक्तिक लाभाच्या योजना लाभ मिळत असल्याचे सांगितले. तर काही ग्रामपंचायतमार्फत विशिष्ट लोकांनाच लाभ दिला जात असल्याची नाराजीही व्यक्त केली.
रस्त्यांची दुरवस्था व वन जमिनीचे प्रश्न सुटलेले नाहीत. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अनेकांनी ‘ड’ यादीतही नाव नसल्याचे सांगून पुन्हा नव्याने पुरवणी यादी तयार करविण्याची मागणी केली. तर घरकुल यादीतील लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश ग्रामसेवकांना यावेळी आमदारांनी दिले. धानाच्या बोनसचे चुकारे अजूनही मिळाले नसल्याचे गाऱ्हाणे शेतकऱ्यांनी मांडले. यांसह अनेक प्रश्नांवर व तक्रार अर्जावर तत्काळ संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. स्थानिक प्रश्नांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून उत्तरे देण्यात आली आणि नागरिकांचे समाधान करण्यात आले. हजारोंच्या उपस्थितीमुळे करडी येथील आढावा बैठक चांगलीच रंगली होती.
यावेळी मोहाडीचे नायब तहसीलदार सोनकुसरे, करडीचे ठाणेदार नीलेश वाजे, आरोग्य अधिकारी डॉ. पी. जी. तलमले, वनाधिकारी अस्लाम, पंचायत विभागाचे अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सर्व गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.
बॉक्स
जनावरांच्या संख्येनुसार मिळणार गोठे
जनसंपर्क दौऱ्यात पशुपालकांनी रोहयोतून मिळणाऱ्या गुरांच्या गोठ्यांची मागणी केली. स्थानिक लोकप्रतिनिधींवर आक्षेपही घेतले असता, आमदार राजू कारेमोरे यांनी आता सर्वांनाच जनावरांच्या संख्येनुसार गुरांचे गोठे मंजूर करण्यात येतील. स्थानिक स्तरावर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिल्याने पशुपालकांनी आनंद व्यक्त केला.
कोट
कृषिपंपाचे तीन महिन्यांचे बिल दीड लाख
विद्युत विभागामार्फत कृषिपंपांसाठी येणारे बिल हे रीडिंगनुसार न येता मनमर्जीने येत आहेत. त्यामुळे शेतकरी बिल भरण्यास अडचणी असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली. जांभोरा येथील काही शेतकऱ्यांनी तीन महिन्यांचे बिल दीड लाखापर्यंत आल्याची कैफियत ऐकविताच सर्वत्र शांतता पसरली. अखेर आमदारांनी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत विभागाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावित तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
180921\img_20210917_165606.jpg
आ. राजू कारेमोरे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
जांभोरा येथील जनसंपर्क दौरा फोटो