लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका भात शेतीला बसल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी मात्र ६५ टक्के घोषित झाली आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या या पैसेवारीत जिल्ह्यातील केवळ १२९ गावेच ५० पैशाच्या आंत आहे. तर ५० च्यावर पैसेवारी असलेल्या ७१६ गावांना दुष्काळी मदतीचा कोणातही लाभ होणार नाही. या अंतीम पैसेवारीने शेतकऱ्यांचा जखमेवर एक प्रकारे मिठच चोळले आहे.भंडारा हा जिल्हा प्रमुख धान उत्पादक आहे. धान पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात गरज असते. पंरतु यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. याचा फटका धान पिकाला बसला. अनेक शेतकºयांचे उत्पन्न घटले. दुष्काळ घोषित करावा अशी मागणी होवू लागली होती. सुरुवातीला जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळसदुश्य म्हणून घोषित झाले होते. मात्र अंतिम यादीत जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नव्हता. त्यामुळे सर्व शेतकºयांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते.नागपूर विभागाची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबररोजी जाहिर करण्यात आली. त्यात भंडारा जिल्ह्यात खरीप हंगाम २०१८ च्या ८४५ गावांची अंतिम पैसेवारी प्रसिध्द करण्यात आली. जिल्ह्यात खरीपाची ८९८ गावे आहेत. त्यापैकी ३९ गावे पीक नसलेली आहेत. त्यामुळे ८८५ गावांची पैसेवारी घोषित करण्यात आली आहे. १४ रबी गावांची पैसेवारी रबी हंगामानंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. भंडारा तालुक्याची अंतिम पैसेवारी ६५, पवनी ६४, तुमसर ६५, मोहाडी ४९, साकोली ७२, लाखांदूर ७०, लाखनी ७३ अशी आहेत. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६५ टक्के घोषित करण्यात आली आहे.राज्यशासनाने दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके व २६८ महसुली मंडळाव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्रातील ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची विहित प्रपत्रातील माहिती सादर करण्यात आली आहे. त्यात भंडारा जिल्ह्यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेली १२९ गावे आहेत. भंडारा तालुक्यात ४८, मोहाडी ८१ गावांचा समावेश आहे. तर पवनी, तुमसर, साकोली, लाखांदूर, लाखनी या तालुक्यातील एकही गाव ५० पैशापेक्षा कमी पैसेवारीत आले नाही.या अंतिम आणेवारीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. ५० पेक्षा कमी पैसेवारी घोषीत झाल्यास शासनाच्या दुष्काळी मदतीचा लाभ मिळू शकतो. जिल्ह्यात दुष्काळ सदुश्य परिस्थती असतांना आणेवारी ६५ निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.५० पैशापेक्षा ७१६ गावांची पैसेवारी अधिकमहसुल विभागाने घोषित केलेल्या अंतिम पैसेवारीत जिल्ह्यातील ७१६ गावांची पैसेवारी ५० पैक्षा अधिक आहे. त्यात भंडारा तालुका १२०, पवनी १४१, तुमसर १४३, मोहाडी २७, साकोली ९४, लाखांदूर ८९ आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांचा समावेश आहे.
जिल्ह्याची खरीप पीक अंतिम पैसेवारी ६५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 9:56 PM
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका भात शेतीला बसल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी मात्र ६५ टक्के घोषित झाली आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या या पैसेवारीत जिल्ह्यातील केवळ १२९ गावेच ५० पैशाच्या आंत आहे. तर ५० च्यावर पैसेवारी असलेल्या ७१६ गावांना दुष्काळी मदतीचा कोणातही लाभ होणार नाही. या अंतीम पैसेवारीने शेतकऱ्यांचा जखमेवर एक प्रकारे मिठच चोळले आहे.
ठळक मुद्देखरीप हंगाम : ८४५ पैकी केवळ १२९ गावे ५० पैशाच्या आंत