इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवकभंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून दृष्काळसदृश परिस्थिती असताना नजरअंदाज पैसेवारीच्या आकडेवारीवर नजर फेरल्यास जिल्हा प्रशासनाचा हा जावईशोध शेतकºयांना तारणार काय? असा उपरोधिक सवाल आपसुकच निर्माण झाला आहे.महसूल विभागाने घोषित केलेल्या नजरअंदाज हंगामी पैसेवारीत पिक स्थिती उत्तम दाखवून शेतकºयांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीपासूनच कमी पर्जन्यमानामुळे दृष्काळसदृश्य परीस्थिती असताना आता पिक परीस्थिती उत्तम कशी झाली, असा सवाल शेतकरी करीत आहेत.जिल्हा प्रशासनाने एकूण ८८४ गावांपैकी ८४३ गावांची नजरअंदाज हंगामी आणेवारी ६९ पैसे दर्शविली आहे. यात ५० पैसांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या एकही गावाचा समावेश नाही, हे येथे उल्लेखनीय. टेबलवर बसून आकडेवारी तयार करण्यात आली काय? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. शेतात पाणीची पडले नाही तर धान्य कसे उगवणार मग आमच्या क्षेत्राची आणेवारेी जास्त कशी? गव्हाससोबत सोंड्या दळण्याचा प्रकार बंद झाला पाहिजे, असेही श्ेतकरी बोलत असताना त्ळांची दखल घेण्यात आलेली नाही. ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४३ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६८ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची पैसेवारी ६३ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ७१ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ७६ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ६१ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ७५ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ७१ पैसे दाखविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने धानपिकाची योग्य चौकशी करून दि. १५ जानेवारी रोजी जाहीर होणाºया अंतिम आणेवारीत शेतकºयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा केली आहे.प्रकल्पाच्या पाण्यासाठी टाहोमागील दशकापासून जिल्ह्याला नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी त्यात आणखी भर पडली. मृग आणि रोहणी नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणी लांबणीवर गेली. शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. नंतरच्या काळात थोडा पाऊस बरसला. त्यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे पीक करपले. जलाशयात पाणी असून त्याचा फायदा शेतकºयांना मिळाला नाही. मिळेल त्या साधनाने पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न शेतकºयांनी केला. धान निसव्यावर पाण्याची कमतरता आणि धानपिकावर किडींचा वाढता प्रादुर्भावामुळे धान्याच्या लोंबा भरलेल्या नाहीत. दुसरीकडे प्रकल्पांचे पाणी मिळत नसल्याने सुल्तानी संकटही कायम आहे. आधीच धानाला हमीभाव नसताना दुसरीकडे उत्पादनात घट येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ६९ पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 11:54 PM
धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केली आहे.
ठळक मुद्देप्रशासनाचा जावईशोध : शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न