लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खिळेमुक्त झाडे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आल्याने राजेश राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘राष्ट्रस्तरीय नेताजी सुभाषचंद्र बोस भारत सन्मान पुरस्कार २०१८’ गौरव करण्यात आला.खिळेमुक्त झाडं अभियान ही संकल्पना अगदी निराळी आणि वेगळीच, परंतू ती प्रत्यक्षात साकार झाली असून आज या संस्थेचे काम चचेर्चा विषय ठरला आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी खिळेमूक्त झाडे ही मोहीम राबविण्याचा संकल्प राजेश राऊत यांनी केला होता. भंडारा शहरातील शेकडो लोक या मोहिमेमध्ये सहभागी झाली आहेत.भंडारा या ठिकाणी हे अभियान राबवून रस्त्यावरील झाडांचे खिळे, खिळ्यानी ठोकलेले बॅनर आणि जाहीराती काढून हजारो झाडे खिळेमूक्त आणि वेदनामुक्त करण्यात आली. या कार्याची दखल घेऊन हिंदवी स्वराज्य संघटना मुंबईच्या ८ व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात सेवेबद्दल विशेषत: खिळेमुक्त झाडे अभियानातील योगदानाबद्दल राजेश राऊत व त्यांच्या सहकाºयांना ‘राष्ट्रस्तरीय नेताजी सुभाषचंद्र बोस भारत सन्मान पुरस्कार २०१८’ जनता केंद्र सभागृह, मुंबई येथे सुरेश साळवी, सुरज भोईर यांच्या हस्ते देण्यात आला.अंघोळीची गोळी संस्थेच्या खिळेमुक्त झाडे या मोहिमेने लोकांच्या मनामध्ये झाडांप्रती आदरभाव निर्माण होऊन झाडे लावा आणि झाडे जगवा या विचाराला अधिकच बळकटी मिळून आपला भंडारा आणि महाराष्ट्र भारतामध्ये एक प्रगत शहर आणि राज्य म्हणून पुढे येण्यास मदत होईल असे राजेश राऊत म्हणाले.खिळेमूक्त झाडं मोहीम भंडारा या अभियानाला पूरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अंघोळीची गोळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे आभार मानण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले. यावेळी राजेश राऊत, जाधवराव साठवणे, नेमाजी करकाडे, हेमंत धूमनखेडे, आशिष भूरे, देविदास लांजेवार, झेड. आय. डहाके, .ांगला डहाके,माला बगमारे सचिव, सूषमा पडोळे,पुनम डहाके, नंदा चेटूले,स्वाती सेलोकर व कूमार वरद डहाके, जय सेलोकर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुरस्कार प्राप्तीचे श्रेय सर्वांचे असल्याचे सांगण्यात आले. प्रास्ताविक जाधवराव साठवणे यांनी तर आभार प्रदर्शन राजेश राऊत यांनी केले.
खिळेमुक्त झाडे अभियानाला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 9:48 PM
खिळेमुक्त झाडे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आल्याने राजेश राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘राष्ट्रस्तरीय नेताजी सुभाषचंद्र बोस भारत सन्मान पुरस्कार २०१८’ गौरव करण्यात आला.
ठळक मुद्देमुंबईत गौरव : नेताजी सुभाषचंद्र बोस भारत सन्मान पुरस्काराने गौरव