लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या भंडारारोड (वरठी) येथे जलदगती रेल्वे थांब्याच्या बाबतीत लोकप्रतिनिधींसह रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी रेल्वेच्या तिरंगाईने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात जिल्हा रेल यात्री सेवा समिती भंडारातर्फे नवनियुक्त आमदार नरेंद्र भोंडेकर व राजू कारेमोरे यांना निवेदन दिले आहे.भंडारारोड रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांच्या थांब्याबाबत मागणी करूनही सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. गोंदिया व त्यानंतर मोठ्या महत्वपूर्ण रेल्वे स्थानकावर जलदगती रेल्वे गाड्यांचे थांबा देण्यात येते. मात्र भंडारा येथे थांब्यांबाबत उदासीन भूमिका घेण्यात आली आहे.रेल्वेयात्री समितीने यापुर्वी ज्ञानेश्वरी, हावडा कुर्ला पुरी-शिर्डी या गाड्यांचे थांबे मिळावेत व सेवाग्राम एक्सप्रेस गोंदियापर्यंत विस्तारीत करण्यात यावी, अशी मागणी केली होती.यासंदर्भात लोकप्रतिनिधींसह रेल्वे बोर्ड व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र लोकप्रतिनिधी याकडे पाठपुरावा करण्यात असमर्थ ठरल्याचे रेलयात्री सेवा समितीचे म्हणणे आहे.समितीच्या मागणीवरून नागपूर विभागीय व्यवस्थापकांनी बिलासपूर-पुणे या गाडीच्या थांब्यासाठी बिलासपूर संभागच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठविले असले तरी एक वर्षाचा कालावधी लोटूनही कारवाही झालेली नाही. तसेच थांबाही देण्यात आला नाही. यासंदर्भात खासदारांनाही निवेदन देण्यात आले होते.नागपूर-सिकंदराबाद या रेल्वे गाडीचे २३ डिसेंबरला रायपूरपर्यंत विस्तारीत करण्यात आले आहे. त्याचाही थांबा भंडारा येथे देण्यात आला नाही.याबद्दलही प्रवाशी प्रश्न उपस्थित करीत आहे. जलदगती रेल्वे गाड्यांचे थांबे देण्यात यावे, या मागणीला घेवून रेल यात्री सेवा समितीच्यावतीने आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांनी पुढाकार घ्यावा, असा प्रश्न रेटून धरला आहे.भंडारा स्थानकाला वगळलेनागपूर-सिकंदराबाद या रेल्वे गाडीला रायपूरपर्यंत विस्तारीत करण्यात आले. रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, अजनी, वरोरा, चंद्रपूर आदी रेल्वे स्थानकात या रेल्वेला थांबे देण्यात आले. मात्र भंडारारोड रेल्वे स्थानक थांब्यामधून वगळण्यात आले आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींची बघ्याची भूमिका आहे.रेल्वेला महसूल उपलब्ध करून देण्यात भंडारारोड रेल्वे स्थानकही महत्वपूर्ण भूमिका बजावत असताना जलदगती रेल्वेंच्या थांब्याबाबत रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधी उदासीन दिसत आहेत. यावर लवकरच तोडगा काढून अन्य रेल्वे गाड्यांनाही वरठी येथे थांबा मिळणे आवश्यक आहे.-रमेश सुपारे, सचिव, जिल्हा रेलयात्री सेवा समिती, भंडारा.
रेल्वेच्या जलदगती थांब्याला ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 5:00 AM
भंडारारोड रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांच्या थांब्याबाबत मागणी करूनही सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. गोंदिया व त्यानंतर मोठ्या महत्वपूर्ण रेल्वे स्थानकावर जलदगती रेल्वे गाड्यांचे थांबा देण्यात येते. मात्र भंडारा येथे थांब्यांबाबत उदासीन भूमिका घेण्यात आली आहे. रेल्वेयात्री समितीने यापुर्वी ज्ञानेश्वरी, हावडा कुर्ला पुरी-शिर्डी या गाड्यांचे थांबे मिळावेत व सेवाग्राम एक्सप्रेस गोंदियापर्यंत विस्तारीत करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
ठळक मुद्देप्रवासी संतप्त : जिल्हा रेल यात्री सेवा समितीचे निवेदन