लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या सांस्कृतीक वैभवात भर घालणाऱ्या सन्मित्र गणेश उत्सव मंडळाने यावर्षी गणेशपूरचा राजा श्रीफळातून (नारळ) साकारण्याचा संकल्प केला. हा संकल्प पुर्णत्वास जात असून वैशिष्ट्यपूर्ण अशी श्रीफळातून श्रीची मुर्ती आकारास येत आहे. सामाजिक प्रबोधन आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा गणेशात्सव शहरवासीयांसाठी पर्वणी ठरणार आहे.भंडारा शहरातील गणेशपूर परिसरात गणेशपूरच्या राजाची दरवर्षी स्थापना केली जाते. दरवर्षी विविधता व वेगळेपण जपणाºया या मंडळाने सामाजिक जाणीवाही जोपासल्या आहेत. यावर्षी श्रीची मुर्ती श्रीफळातून साकारण्याचा संकल्प मंडळाचे अध्यक्ष विनोद भुरे यांनी केला. मंडळाच्या सर्व सहकार्यांच्या मदतीने श्रीफळातून अर्थात नारळातून २१ फूट उंचीची मुर्ती आकारास येत आहे. या शिवाय मंडप परिसरात निसर्गरम्य देखावा, रोषनाई, उत्कृष्ठ सजावट, आरास भाविकांचे मन व नेत्र तृप्त करेल यात शंका नाही.यासोबत सामाजिक प्रबोधन, पर्यावरण, जागृती, रक्तदानशिबिर आयोजित करण्यात येणार आहे. श्री च्या दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी आनंदमेळावा आणि मिनी सर्कसचे आयोजन करण्यात आले आहे. हे या वर्षीचे खास आकर्षण ठरणार आहे. गणेश भक्तांची सेवा व शिस्तबध्दता यासाठी मंडळाचे कार्यकर्ते तत्पर आहेत. गुरुवारी श्री गणेशाचे वाजतगाजत प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.नारळ विक्रीतून विद्यार्थ्यांना मदतसन्मित्र गणेश उत्सव मंडळाच्या वतीने पर्यावरण पुरक अशी नारळापासून गणेशाची मुर्ती तयार केली आहे. विसर्जन करण्यापुर्वी श्रीच्या मुर्तीचे नारळ भाविकांना प्रसाद म्हणून अल्प देणगी घेवून देण्यात येतील. या देणगीतून गोळा झालेली रक्कम समाजातील होतकरु, गरजू, कमकुवत हुशार विद्यार्थ्यांना दिली जाईल, असे विनोद भुरे यांनी सांगितले.
‘गणेशपूरचा राजा’ साकारतोय श्रीफळातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:18 PM
शहराच्या सांस्कृतीक वैभवात भर घालणाऱ्या सन्मित्र गणेश उत्सव मंडळाने यावर्षी गणेशपूरचा राजा श्रीफळातून (नारळ) साकारण्याचा संकल्प केला. हा संकल्प पुर्णत्वास जात असून वैशिष्ट्यपूर्ण अशी श्रीफळातून श्रीची मुर्ती आकारास येत आहे. सामाजिक प्रबोधन आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा गणेशात्सव शहरवासीयांसाठी पर्वणी ठरणार आहे.
ठळक मुद्देसामाजिक प्रबोधन : सन्मित्र गणेश मंडळ