शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

मुख्याध्यापकांच्या कक्षात लिपिकाचा परिचरावर चाकूने हल्ला

By admin | Published: June 24, 2017 12:20 AM

येथील जिल्हा परिषद शाळेतील लिपीक व परिचरात २० रूपयावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले.

सिहोरा जि.प. शाळेतील घटना : परिचर जखमी, आरोपी लिपीक फरारलोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड /तुमसर : येथील जिल्हा परिषद शाळेतील लिपीक व परिचरात २० रूपयावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. त्यानंतर लिपीकाने परिचरावर धारदार चाकूने हल्ला केला. ही घटना शुक्रवारला सकाळी १०.३० वाजता दरम्यान मुख्याध्यापकाच्या कक्षात घडली. विकास चिंतामन भुरे (४२) रा.तुमसर असे जखमी परिचराचे नाव असून आशिष रामटेके (२६) रा.तुमसर असे आरोपी कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. सिहोरा स्थित जिल्हा परिषद शाळेत यातील आशिष रामटेके हा कनिष्ठ लिपीक पदावर तर फिर्यादी विकास भुरे हा परिचर पदावर कार्यरत आहे. हे दोघेही कर्मचारी शुक्रवारला सकाळी शाळा उघडून सफाईचे काम करीत होते. दरम्यान परिचर विकास भुरे हे दमल्याने मुख्याध्यापकाच्या कक्षातील खुर्चीवर आराम करीत होते. तेवढ्यात कनिष्ठ लिपीक आशिष रामटेके तिथे आले आणि भुरे यांना तुमसरला जाण्यासाठी तिकीटासाठी २० रूपये मागितले. परिचर भुरे यांनी त्याला प्रतिसाद दिला. तेवढयात आरोपी आशिष रामटेके हा शाळेबाहेर निघाला. त्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी भुरे यांना पैशाची मागणी करूनही तु पैसे देत नाही म्हणून चाकुसारख्या धारधार शस्त्राने (कटर ब्लेड) उजव्या पायाच्या मांडीवर वार केले. यात तो रक्तबंबाळ झाला. एवढयात घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याच शाळेतील दुसरे परिचर योगीलाल कटरे यांनी मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला. त्यानंतर आरोपी कनिष्ठ लिपीक रामटेके हा फरार झाला. कटरे यांनी जखमी विकास भुरे यांना सिहोरा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सिहोरा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. यातील आरोपी कनिष्ठ लिपीक आशिष रामटेके याच्याविरूद्ध भादंवि ३२४ कलमान्वये गुन्हा नोंदविला. फरार लिपिकाचा सिहोरा पोलीस शोध घेत आहेत. घटनेचा तपास ठाणेदार कदम यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार जयसिंग लिल्हारे हे करीत आहे.कारवाईचा प्रस्ताव पाठवणार -तूरकरसिहोरा जिल्हा परिषद शाळेत घडलेली घटना गंभीर आहे. एकीकडे शाळेला प्रगतीपथावर नेण्याची संकल्पना असताना हा प्रकार थेट मुख्याध्यापकाच्या कक्षात घडणे ही शोकांतिका आहे. या प्रकरणाची चौकशी शालेय व्यवस्थापन समितीकडून करण्यात येईल. यातील दोंषीवर कारवाईसाठी संबंधितांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे जिल्हा परिषद सदस्य तथा सिहोरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनेंद्र तुरकर यांनी सांगितले.