इमारतीला तडे : खासदार दत्तक गावातील प्रकारतुमसर : सांसद आदर्श ग्राम अंतर्गत निवड करण्यात आलेल्या गर्रा हेटी (बघेडा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेले असून २५ विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ज्ञानार्जन करावे लागत आहे. एका निलंबित शिक्षकाचे वेतन या शाळेतूननिघत असून दोन शिक्षकी शाळेत एक शिक्षकाचे कर्तव्य केवळ कागदावर सुरु आहे. चार वर्गांना येथे एकाच शिक्षकाला अध्यापनाचे कार्य करावे लागत आहे. जिल्हा पषिदेची वर्ग १ ते ४ दोन शिक्षकी शाळेत सिरसाम नामक शिक्षकांचा मृत्यू मार्च २०१३ मध्ये झाले होते. त्यांच्या जागेवर ठाकुर या शिक्षकांची नेमणूक येथे करण्यात आली. नियमित न येण्यास ठाकुर येथे कटीबद्ध आहेत. येथे सध्या व्ही.बी. कडव हे एकच शिक्षक नियमित असून ते पहिली ते चवथीच्या २५ विद्यार्थ्यांना अध्यापन करीत आहेत. या शाळेतून खरबी येथील निलंबित शिक्षकाचा उदरनिर्वाह भत्ता नियमित निघत आहे. येथील शाळा इमारत जीर्ण झाली आहे. दोन खोल्यात चार वर्ग आहेत. एका वर्ग खोलीला तडे गेले आहे. इमारतीच्या मागे आवारभिंत नाही. दि. २० डिसेंबर रोजी या शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी भेट दिली होती. समस्या सोडवून त्याची पूर्तता करून देऊ असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे अधिकारी दुर्लक्ष करतात असा आरोप करुन आंदोलन करण्याचा ईशारा शाळा समिती सदस्य प्रकाश लसुंते यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
जीव धोक्यात घालून विद्यार्थी करतात ज्ञानार्जन
By admin | Published: December 29, 2014 11:37 PM