भंडारा : ग्रामीण भागातील मुलांचे कुपोषण थांबावे, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरु केली आहे. मात्र या योजनेने ज्ञान मंदिराला अन्नछत्रालयाचे स्वरुप आले असून कल्याणकारी योजनांची खिचडी झाल्याचे प्राथमिक शाळांमधून दिसून येत आहे. सर्वशिक्षा अभियानाने शिक्षकांना शिक्षा दिल्याचे दिसत आहे. राज्य शासनाने मध्यान्ह भोजन ही योजना सुरु केली. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार दिला जातो. शाळांमध्ये खिचडी शिजवून विद्यार्थ्यांना वितरणाची जबाबदारी अनेक गावांमध्ये बचतगटांकडे दिली आहे. शाळांमध्ये किचन शेड उभारण्यात आले आहे. मात्र अप्रत्यक्ष जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरच येऊन पडते. वरकरणी बचत गट दिसत असले तरी शिक्षकांना यामध्ये गुंतून पडावे लागते. सर्वशिक्षा अभियानाने अनेक सकारात्मक बदल झाले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. (शहर प्रतिनिधी)
ज्ञान मंदिर नव्हे अन्न छत्रालय
By admin | Published: December 23, 2014 10:58 PM