लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : ग्रामपंचायत कार्यालय कोंढा यास आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र मिळविणारी पवनी तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत सरपंच या वैद्यकीय पदवी घेतलेल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात गावात अनेक कामे झाली. त्यामुळे गावाचा विकास होण्यास मदत झाली आहे.सरपंच डॉ. नूतन कुर्झेकर यांनी ग्रामपंचायत सरपंच पदाचा पदभार घेतल्यानंतर स्वच्छतेला महत्व दिले. संपूर्ण गावात तरूण व महिला मंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविले. गावातील कचरा जमा करण्यासाठी कचरागाडी सुरू केली. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वॉर्ड नं. ३ मध्ये शेषखड्डा तयार केला. गावात आतापर्यंत बाजारदुरूस्ती व सुुशोभिकरण, नाल्यावर कव्हरसेड, हॅन्डपंप ६, तसेच लोकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी जीवन प्राधीकरण विभागाने बांधलेली बाजारातील पाण्याची टाकी सुरू केली. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या बºयाच प्रमाणात सुटली आहे. गावात महिलांचे २० महिला बचत गट तयार झाले, त्यांना आर्थिक उन्नतीसाठी बँकामार्फत कर्ज मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहे. ग्रामपंचायत कोंढातर्फे आरोग्य मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी दहावी, बारावी परीक्षामध्ये गावातून प्रथम, द्वितीय आलेले विद्यार्थ्यांना पुरस्कार दिले जात आहे. गावात अनेक व्यक्तीत शौचालय व अनेक लाभाच्या योजना राबविल्या जात आहेत.गावात आतापर्यंत शासनाकडून व जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्या फंडातून सिमेंट काँक्रीट रस्ते, हनुमान मंदिर तसेच जलकुंभाजवळ सपाटीकरण, जि.प. उपाध्यक्ष यांच्या निधीतून गावात सिमेंट २२ खुर्च्या बसविल्यात. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र दुरूस्ती केली आहे. यासह विविध विकास कामांचा धडाका गावात सुरू आहे.
कोंढा ग्रामपंचायतीला 'आएसओ'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 10:37 PM
लोकमत न्यूज नेटवर्क कोंढा (कोसरा) : ग्रामपंचायत कार्यालय कोंढा यास आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र मिळविणारी पवनी ...
ठळक मुद्देभरारी : पवनी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत