सिहोरा परिसरातील नागरिकांना दर्जेदार वीजसेवा देण्यासाठी ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. उपकेंद्र मंजुरीसाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांना मोठे आंदोलन करावे लागले आहे. परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याचे कारणावरून उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. थ्री फेज वीजपुरवठा असताना भारनियमन करण्यात येत असल्याने, सिंगल फेज योजना सुरू करण्यात आली आहे. अनेक वर्षे सिंगल फेज योजनेने तारले आहे. या कार्यलयात गावांची व्याप्ती मोठी असल्याने, दोन विभागांत कार्यालयाची विभागणी करण्यात आली आहे. सिहोरा १ आणि सिहोरा २ असे शाखा अभियंता पदे देण्यात आली आहेत. ४७ गावांची धुरा या कार्यलयात आहे. तरुणतुर्क शाखा अभियंता असल्याने वीज ग्राहकांच्या समस्या जलद गतीने निकाली काढण्यात येत आहेत. यामुळे कुणाच्या तक्रारी नाहीत, परंतु या या कार्यलयात ये-जा करण्यासाठी मुख्य रस्ताच नाही. पावसाळ्यात व चांदपूर जलाशयाचे पाणी वाटपात वीज वितरण कंपनीच्या रस्त्यावर पाणीच पाणी राहत आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील पुलाचे बांधकाम जीर्ण झाले आहे. यामुळे उपकेंद्रात पाणीच पाणी राहत आहे. पाणी राहत असल्याने साप विंचवाचे वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे. शासन दरबारी सिमेंट रस्ता बांधकाम मंजुरीसाठी अनेक निवेदन व प्रस्ताव देण्यात आले आहेत, परंतु दुर्लक्ष करण्यात येत आहे.
बॉक्स
ग्रामपंचायतीला करवसुली :- गावांचे हद्दीत असलेल्या या कार्यलयावर ग्रामपंचायत कर वसूल करीत आहे. लाखो रुपयांचे घरात करवसुली आहे, परंतु प्रत्यक्षात वीज वितरण कंपनीच्या कार्यलयात अद्याप कामे करण्यात आले नाही. यापूर्वी ग्रामपंचायतीने सिमेंट रस्ता बांधकामासाठी पुढाकार घेतला होता, परंतु जागेचे हस्तांतरण करण्यात आले नसल्याने नंतर ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला नाही. वीज वितरण कंपनी अथवा ग्रामपंचायतीने रस्ता बांधकाम करावे, असे मत अनेकांचे आहे.