शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

ग्रामीण भागात घनकचरा केंद्राचा अभाव

By admin | Published: April 19, 2015 12:35 AM

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हास्तरावर डंम्पिंग यार्डची निर्मिती करण्यात आली आहे.

गावात कचऱ्याचे ढिग : आरोग्य सुविधेवर प्रश्नचिन्ह रंजित चिंचखेडे  चुल्हाडभंडारा : कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हास्तरावर डंम्पिंग यार्डची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु स्वच्छ गावाच्या भूमिकेसाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हा पॅटर्न भंडारा जिल्ह्यात अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा हा उपक्रम राबविताना जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.देशात स्वच्छ भारत अभियानात केंद्र शासनाचा मोठा भर आहे. शहर आणि गावांना या अभियानात जोडण्याचा प्रयत्न होत आहे. या उपक्रमात गावकरी सहभाग घेत आहे. उपक्रमाचा अनुभव गावकऱ्यांना आहे. यामुळे गावात स्वच्छता दिसून येत आहे. या उपक्रम अंतर्गत गावात कचरा कुंडी तयार करण्यात आली आहेत. कचरा कुंड्या तुडूंब भरलेल्या आहेत. ग्रामपंचायतमार्फत कचराकुंडी स्वच्छ करण्यात येत असले तरी या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट गावाच्या शेजारी करताना दुर्गंधीची भिती निर्माण होत आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात कचऱ्याची विल्हेवाट लावताना ग्रामपंचायतींना कसरत करावी लागत आहे. या परिसरातील नाले हे वैनगंगा आणि बावनथडी नद्यांना जोडण्यात आली आहे. नाल्यात कचरा घातल्यास नद्यांचे पाणी आणि स्वच्छता दूषित होण्याची चिंता आहे. शहरात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु बपेरा मार्गावर या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यात येत आहे. यामुळे तुमसरात दाखल होताना ये-जा करणाऱ्या नागरिकांचे स्वागत दुर्गंधीचे होत आहे. दरम्यान गावात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतांची निर्मिती करण्याचा पॅटर्न गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. २ ते ४ हजार लोकवस्तीच्या गावात घनकचरा वर्गिकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. गावाबाहेर शेड उभारण्यात आले असून विघटन आणि अविघटन असा कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. टाकावू कचऱ्यावर प्रक्रियेतून खत निर्मिती करण्याचा उपक्रम गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जीर्ण नालीमुळे घाणच घाणगावात सांडपाणी वाहुन जाणाऱ्या नालीचे बांधकाम १० ते १५ वर्षापुर्वी करण्यात आली आहेत. घरांचे नव्याने बांधकाम होत असल्याने या नाल्याची दिशा बदलली आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावताना या नाल्या असमर्थ ठरत आहे. गावातील संपूर्ण पाण्याची विल्हेवाट लावणारी प्रमुख नाली मोठ्या नाल्यांला जोडणारी नाही. यामुळे पाणी गावातच मुरत आहे तर पावसाळ्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे.गावात कचऱ्यांची मोठी समस्या आहे. निधीअभावी स्वच्छता रखडली आहे. घनकचरा वर्गीकरण केंद्र प्रत्येक गावात निर्माण करण्याची गरज आहे. यामुळे कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यास मदत होईल. - छगनराव पारधी, सरपंच धनेगाव.गावातील कचऱ्यांची सातत्याने उचल करणारी साधने ग्रामपंचायतकडे नाहीत. यामुळे स्वच्छता प्रभावित होत आहे. - नेहा पटले, सदस्य ग्रामपंचायत चुल्हाड.