लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : यावर्षी बळीराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. येरंडी हे गाव मालकी हक्क नवेगावबांध तलावाच्या अधिकार क्षेत्रात येते. पण या येरंडी परिसरातील शेतीला कधीच पुरेसे पाणी मिळत नाही. अशी व्यथा या गावचे शेतकरी नेहमी मांडतात.येरंडी गावात दरवर्षी पावसाळी शेतजमिनीवर शंभर टक्के पेरणी केली केली जाते. मात्र शेतातील पीक टिकविण्यासाठी धान पिकाच्या शेवटपर्यंत पाणी आवश्यक असते. नवेगावबांध मालकी हक्क क्षेत्रात नरेगाव, देवलगाव, खोलीबोंडे, येरंडी व मुगली असे पाच गावे येतात. या मालकी हक्क क्षेत्रात फक्त नवेगावबांध, देवलगाव आणि लागून असलेला खोलीबोंडे हेच गावे पिकतात. पण येरंडी व मुंगली ही गावे पाण्याच्या अभावाने चांगली शेती पिकवत नाही. पुरेसे पाणी मिळत नाही, हे यामागील प्रमुख कारण आहे.नवेगावबांध तलावाचे पाणी या पाच गावांना मोफत मिळत आहे. पण कुणाला मायेचा तर कुणाला मावशीचा, असा प्रकार केला जातो. या तलावाचे पाण्याविषयीची पूर्ण अधिकार काय? हे समजत नाही. याकडे नवेगावबांध सार्वजनिक बांधकाम कार्यालय लक्ष देत नाही, असे शेतकरी सांगतात व चिंता व्यक्त करतात.या तलावाचे पाणी कधीच उंचीवर असलेल्या शेतकºयांच्या शेतात पोहोचत नाही. येरंडीला नवेगावबांध मार्गावरच्या शेतीला फक्त कसेतरी ओढूनताणून पाणी मिळते. पण कुंभीटोला या मार्गावरील कालव्याला पाणी बरोबर मिळत नाही. या क्षेत्राचे पाणी कमी करण्यात आले आहे. कालवा केरकचºयाने ग्रासला आहे. तर नवेगाव, देवलगाव इकडेच पाणी अडतो. या पाण्यावर नवेगावचेच शेतकरी आपली मालकी गाजवतात आणि येरंडी गावाला पुरेसे पाणी सोडत नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.हल्ली तलावात जवळपास सात फूट एवढे पाणी आहे. तरी पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. अशा प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तलावाच्या पाण्यावर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा कानाडोळा आहे. ते जबाबदारी घेत नाही. शासनाकडून कोट्यवधी रुपये तलावाच्या कामासाठी खर्च केले जातात. पण शेतकºयांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. येरंडीच्या शेतकºयांना पुरेसे पाणी देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.येरंडी भागाकडील पाणी कमी करण्यात आले आहे. मी समितीला सांगितल्यावर ते करतील, पण पाण्यासाठी वरचे शेतकरी ओरडत आहेत. त्यांची मागणी पूर्ण करू आणि पाणी पुरेसे देवू.इंजि.बी.बी. बिसेनशाखा अभियंता, नवेगावबांध
शेतीसाठी पाण्याचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:28 PM
यावर्षी बळीराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. येरंडी हे गाव मालकी हक्क नवेगावबांध तलावाच्या अधिकार क्षेत्रात येते.
ठळक मुद्देयेरंडी गावाची व्यथा : मालकी हक्क असूनही पुरेसे पाणी नाही