शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
3
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
4
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
5
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
6
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
7
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
8
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
9
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
10
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
12
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
13
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
14
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
15
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
17
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
18
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
19
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
20
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा

जुलै महिन्याअखेरही तलाव तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 1:03 AM

गत ४८ तासात पाऊस अधामधात बरसला. तसेच नेरला उपसा सिंचनाचेही पाणी सुरु असले तरीही अड्याळ परिसरातील शेतकरी धास्तावलेल्या स्थितीत आहे. मुख्य कारण म्हणजे जुलै महिना संपत आला असला तरी लहान मोठ्या तलावात पाहिजे त्या प्रमाणात पाणी जमा झालेला नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा : रोवणीसाठी शेतकऱ्यांची शेतशिवारात धावपळ

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : गत ४८ तासात पाऊस अधामधात बरसला. तसेच नेरला उपसा सिंचनाचेही पाणी सुरु असले तरीही अड्याळ परिसरातील शेतकरी धास्तावलेल्या स्थितीत आहे. मुख्य कारण म्हणजे जुलै महिना संपत आला असला तरी लहान मोठ्या तलावात पाहिजे त्या प्रमाणात पाणी जमा झालेला नाही.नेरला उपसा सिंचनामुळे काही प्रमाणात बºयाच शेतकऱ्यांना लाभ झाला तर काहींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्य म्हणजे रोवणीचा हंगाम जात असल्यामुळे शेतकरी लवकरात लवकर शेतातील रोवणी करायला गतीशील झाला असला तरी दुसरीकडे काही शेतकºयांची पºहे आधीच पावसाअभावी करपले. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागले. एकंदरीत काही पºहे कसेतरी जगले. मोठेही झाले. पण शेतात पाणीच नाही आणि शेतकºयांच्या शेतात पाणी आहे. त्याला वेळेवर मजूर मिळेना. काही शेतकºयांच्या मते आताची अडचण कशीबशी सुटली. परंतु खरी गरज पाण्याची पुढेही पडणार तेव्हा पाऊस पडला नाही तर मग उभे पीक करपण्याच्या आधी पाणी शेतीला मिळणे आवश्यक आहे.कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ. कधी रोगराई तर कधी नापिकी. शेती नापिकीमुये शेतकºयांचे कुटुंब होत्याचे नव्हते झाले. उध्वस्त झाले पण शेतकºयाने आजही शेती सोडली नाही. सतत दोन दिवसात अड्याळ आणि परिसरात पाऊस पडला असला तरी तलावातील पाणी पाहून प्रत्येक शेतकºयाला मात्र आज विचार करायला भाग पाडले आहे. काही वर्षाआधीपावेतो अड्याळ व परिसरातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर तसेच जवळपास तलावात साचलेल्या पाण्यावर शेती अवलंबून राहाची. मात्र नेरला उपसा सिंचनावर सर्वच शेतकºयांची मोठी आशा दिसून येत असली तरी पाण्याच्या पातळीचे मुख्य कारण समोर येताना दिसते.नेरला उपसा सिंचनाची गरज पुन्हा कोणत्याही क्षणी भासू शकते. ही शक्यताही नाकारता येणार नाही. असावेतीसाठी आतापासूनच खबरदारी घेणे गरजेचे राहील. ज्या शेतकºयांनी रोवणी केली आणि ज्यांची रोवणी बाकी आहे असे दोन्ही प्रकारच्या शेतकºयांमध्ये एकच धास्ती आजही आहे ती म्हणजे फक्त पाणी. काही जाणकारांच्या मते आज गावात आणि परिसरात पाण्याचे मोठमोठे तलाव यावेळी तुडूंब भरून दिसायचे. परंतु आज ती स्थिती नाही. त्यामुळे शेतीलाही पाणी जपून वापरणे ही सुद्धा काळाची गरज बनत चालली आहे.पावसाच्या आगमनानंतरही रोवणी खोळंबलेलीचपालांदूर : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत विदर्भात पावसाच्या सरी कोसळत आहेत. मोठ्या पावसाचा अंदाज जरी खोटा ठरला तरीपण सरीवर सरी दोन तीन दिवस कोसळल्यास रोवणीला न्याय मिळू शकते. शनिवारला केवळ रिपरिप होती. रविवारला सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकºयांचा हिरमोड झाला आहे. पालांदूरचे ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत यांच्या पुढाकारात तहसीलदार लाखनी यांना निवेदनातून नेरला लिफ्टचे पाणी सोडण्याचे कळविले होते. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. पालांदूर परिसरात पहाडी, देवरी, गोंदी येथील नाल्याला पाणी गोसेचे अडल्याने काहींनी रोवणीला आरंभ केला आहे. या नहराच्या पाण्याने भूजल पातळी वाढविण्याकरिता मोठी मदत होणार असून निकामी झालेली विहिर, बोअरवेल्स, फिल्टर पुन्हा नव्या जोमाने कामाला येतील यात शंका नाही. पावसाने सतत ठेवली तर नक्कीच सोमवारपासून रोवणीला गती येणार आहे. पालांदूर परिसरात २५ टक्के रोवणी आटोपली आहे. कोरडवाहूचा शेतकरी आकाशाकडे लक्ष वेधून आहे. मात्र पावसाची नियमितता महत्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीकपात