शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

तलाव कोरडे, गावागावात पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 5:00 AM

यावर्षी कडक उन्हाळा तापू लागताच लहान स्वरुपाच्या तलावांनी जानेवारी महिन्यात नांगी टाकली. तर मध्यम स्वरुपाच्या तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. तलावांवर आधारित पाणी पुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्याचे पाणी उपबल्ध करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कमी खोलीची विहिरी सुद्धा कोरड्या पडल्यात.

ठळक मुद्देउष्णतेत वाढ : पाणीटंचाई आराखडा नावापुरताच

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी पारा ४६ अंशावर चढताच करडी परिसरातील मध्यम तलावांना कोरड पडली आहे. पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने जनावरे व गरजांसाठी आवश्यक पाण्याबरोबर गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. मागील तीन वर्षात तत्कालीन शासनाने पाणी टंचाई व भूगर्भातील पाणी साठा वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरु केली. परंतु तरीही करडी परिसरात योजनेचा फारसा परिणाम अजूनही दिसून येत नाही.मध्यम स्वरुपाच्या तलावात पर्याप्त जलसाठा निर्माण करण्यात ही योजना फारशी यशस्वी ठरताना दिसून आली नाही. योजना फक्त शासकीय यंत्रणापुरतीच योजना मर्यादित ठरल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे. योजनेत लोकसहभाग संपल्याने कंत्राटदारांसाठी योजना पर्वणी ठरल्याचे सांगितले जाते.यावर्षी कडक उन्हाळा तापू लागताच लहान स्वरुपाच्या तलावांनी जानेवारी महिन्यात नांगी टाकली. तर मध्यम स्वरुपाच्या तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. तलावांवर आधारित पाणी पुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्याचे पाणी उपबल्ध करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कमी खोलीची विहिरी सुद्धा कोरड्या पडल्यात. तर मध्यम खोलीच्या विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गात आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून खोदकाम झालेले नाले आज उथळ आहेत. खोदलेली माती नाल्यांच्या काठावरच टाकल्याने तसेच माती पसरविण्यात न आल्याने नाल्याची पाणी साठवण क्षमता वाढलेली नाही. तलावातून कंत्राटदारांनी शासकीय यंत्रयांना हाताशी धरून काळेबेरे केल्याने पाहिजे तसा उपसा झालेला नाही. परिणामी यावर्षी चांगला पाऊस झालेला असतानाही नाले व मध्यम स्वरुपाचे तलाव पाण्याविना मे महिन्यातच कोरडे पडले आहेत. तर सिंचनामुळे मोठ्या स्वरुपाचे तलाव जून महिन्यातच चटका बसताच कोरडे पडण्याच्या स्थितीत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या संतुलनाचा परिणाम भविष्यात भोगावा लागण्याची शक्यता असल्याने आजच कायमस्वरुपी जलसाठे तयार होण्यासाठी विशेष योजनांची व लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे.पर्यावरण संतुलनासाठी सहकार्याची गरजवाढते तामपान व घटते पर्जन्यमान यामुळे मागील काही वर्षापासून जिल्ह्यात शेतकऱ्यांना दुबार पेरणी शेतकºयांना करावी लागते आहे. शेकडो हेक्टर शेती वेळेवर पाऊस न पडल्यास पडीत राहते. रोवणीपर्यंतची शेतकºयांनी केलेली मेहनत व खर्च खंडीत आणि अत्यल्प पावसामुळे वाया जात आहे. या सर्व बाबींचा विचार करता पाणी संकटावर मात करण्यासाठी पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीसाठी सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, प्रतीष्ठीत नागरिक व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे व झाडांना जगविणे सर्वांच्या हिताचे ठरणारे आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प