शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दाेन लाख 80 हजार व्यक्ती निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 5:00 AM

आरटीपीसीआर चाचणीत १२ हजार ५७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, ४५ हजार ८३३ व्यक्ती निगेटिव्ह, ॲन्टिजन चाचणीत ३७ हजार ४९३ व्यक्ती पाॅझिटिव्ह तर २ लाख ३३ हजार ८९७ व्यक्ती निगेटिव्ह आणि टीआरयू- एनएटीमध्ये १२३ पाॅझिटिव्ह तर १६३ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात ८४.९३ टक्के चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देतीन लाख २९ हजार चाचण्या : चाचण्याच्या तुलनेत १५ टक्के आढळले पाॅझिटिव्ह

ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला असला तरी आतापर्यंत तपासणी केलेल्या तीन लाख २९ हजार ८५७ व्यक्तींपैकी तब्बल दाेन लाख ७९ हजार ८७५ व्यक्तींचा काेराेना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर ४९ हजार ६७३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आलेत. चाचणीच्या तुलनेत आतापर्यंत १५.०७ टक्के व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ॲन्टिजन चाचणी करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा उद्रेक झाला असून, सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. मृताचा आकडाही वाढत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत दिलासादायक बाब म्हणजे काेराेना चाचण्यांच्या तुलनेत केवळ १५.०७ टक्के व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळत आहे. विशेष म्हणजे पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात ही टक्केवारी दहाच्याही आत हाेती; मात्र गत दाेन महिन्यांपासून काेराेना संसर्ग वाढल्याने टक्केवारी वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात मार्च २०२० पासून काेराेना चाचण्यांना सुरुवात झाली आतापर्यंत तीन लाख २९ हजार ५४८ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात आरटीपीसीआर ५७ हजार ८९०, ॲन्टिजन २ लाख ७१ हजार ३७२ आणि टीआरयू- एनएटी २८६ व्यक्तींची चाचणी करण्यात आली आहे. आरटीपीसीआर चाचणीत १२ हजार ५७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, ४५ हजार ८३३ व्यक्ती निगेटिव्ह, ॲन्टिजन चाचणीत ३७ हजार ४९३ व्यक्ती पाॅझिटिव्ह तर २ लाख ३३ हजार ८९७ व्यक्ती निगेटिव्ह आणि टीआरयू- एनएटीमध्ये १२३ पाॅझिटिव्ह तर १६३ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात ८४.९३ टक्के चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.सुरुवातीच्या काळात अनेकांनी चाचण्यांची धास्ती घेतली हाेती. पाॅझिटिव्ह आलाे तर काय? असा प्रश्न निर्माण झाला हाेता. गत दाेन महिन्यात काेराेना संसर्ग वाढल्याने सर्दी पडसा झालेले आणि बाहेरगावाहून आलेले व्यक्तीही तत्काळ काेराेना चाचणी करून घेत असल्याचे दिसत आहे. अलीकडे आरटीपीसीआर चाचण्या कमी प्रमाणात करण्यात येत असून, ॲन्टिजन चाचण्यावर भर आहे. अनेक जण एचआरसीटी स्कॅन करून आपला स्काेर पाहत आहे. चाचण्यांच्या तुलनेत पाॅझिटिव्ह निघण्याचे प्रमाण कमी असणे ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. बरे हाेण्याचे प्रमाणही वाढत आहे.

गुरुवारी ३४ मृत्यू १११० पाॅझिटिव्हभंडारा जिल्ह्यात गुरुवारी ३४ जणांचा काेराेनाने मृत्यू तर १११० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ३४ मृत्यूमध्ये भंडारा तालुक्यातील १६, तुमसर आणि पवनी येथे प्रत्येकी ३ साकाेलीत सहा, लाखनी पाच, माेहाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तर  १११० पाॅझिटिव्ह व्यक्तींमध्ये भंडारा तालुक्यातील ४०५, माेहाडी ६३, तुमसर १५३, पवनी १६८, लाखनी ५७, साकाेली २१५ आणि लाखांदूर तालुक्यातील ४९ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ६७३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या असून, त्यापैकी ३७ हजार ७९३ व्यक्ती काेराेनामुक्त झाल्या आहेत. तर ८१७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात ३७ हजार ७९३ व्यक्ती काेराेनामुक्तजिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार ७९३ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहेत. त्यात भंडारा तालुक्यात १५ हजार ९४०, माेहाडी ३१५२, तुमसर ४६९७, पवनी ४३७६, लाखनी ४१०७, साकाेली ३५७०, लाखांदूर १९५१ व्यक्तींचा समावेश आहे. तर ८१७ मृत्यूमध्ये भंडारा ४०२, माेहाडी ७४, तुमसर ९०, पवनी ८६, लाखनी ६१, साकाेली ६७, लाखांदूर ३७ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात गत काही दिवसात मृत्यूची संख्या वाढत आहे. सरासरी २५ जणांचा मृत्यू हाेत असल्याचे दिसत आहे. मृतांमध्ये पन्नाशीच्या आतील व्यक्तींचा समावेश आहे. लक्षणे आढळल्यावर उपचारास दिरंगाई याला कारणीभूत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या