लोगो
२८ लोक १० के
लाखनी : लोकमत सखी मंच शाखा लाखनी अंतर्गत लोकमत सखी अवाॅर्ड व सन्मान कार्यक्रम मानेगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कोरोना काळानंतर प्रथमच सखींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा कार्यक्रम श्रावणाच्या आरंभी सखींना सुखावून गेला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रा. होमराज कापगते हे होते. उद्घाटक म्हणून प्राध्यापक डॉ. सुरेश खोब्रागडे, प्रा. धनंजय तिरपुडे, विदर्भ शाखा संघ लाखनीचे ह. रा. मोहतुरे, वन्यजीवप्रेमी कुलदीप सिंह बाच्छिल, सामाजिक कार्यकर्ता दिनेश पंचबुद्धे, मोहन बांते, लोकमत जिल्हा शाखा व्यवस्थापक मोहन धवड, जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार, अक्षरा खोब्रागडे, सारिका वाघाडे, डोंगरे आदींच्या उपस्थितीत पाहुण्यांच्या हस्ते सखी अवाॅर्ड व सन्मान सोहळा पार पडला. यावेळी २०१९ मध्ये सर्वात जास्त सखी केलेल्या सहा टॉप विनर अवाॅर्ड प्राप्त सखी लतिका काळबांधे, वृंदा पाखमोडे, वैशाली ढेंगे, रेखा पाखमोडे, छाया गायधनी व शाहिन पठाण या सखींना गोल्ड स्टार ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण तालुक्यातील सर्व वाॅर्ड संयोजिकेचा सत्कार भेटवस्तू देऊन त्यांना गौरवण्यात आले. उपस्थित अतिथींनी नोकरी पेशातील महिलाच नाही तर गृहिणीसुद्धा आपला ठसा उमटविण्यात मागे राहिलेल्या नाहीत याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे संपूर्ण तालुक्यातून लोकमतने गौरव व सत्कार कार्यक्रम घेऊन आज ह............................... पोचपावती दिली आहे.
लाखनी तालुक्यातील अनिता फटे, सारिका रोकडे, मनीषा काळे, मंजुषा उरेकर, संगीता घोनमोडे, कल्पना सेलोकर, विद्या राघोर्ते, कुसुम नंदागवळी, वीणा मेश्राम, उज्ज्वला वाघमारे, सलिमा वनवे, हेमा पिंपळे शेंडे, वैशाली शिवणकर, लक्ष्मी मुटकुरे, छबिला दोनवडे, अर्चना सार्वे, सुनीता काटेखाये, यशोदा कुंभारकर, कल्पना बघेले, जोत्सना नंदेश्वर, नलिनी दिघोरे, शिल्पा ढोणे, प्रमिला भोंडे, प्रियंका कमाने, कल्पना सेलोकर, रजनी पडोळे, विमल धांडे, संजीवनी नांन्हे, मेंढेताई, ज्योती साठवणे, रिता धांडे, वरंदू गिरेपुंजे, यशोदा सार्वे, सारिका वाघाडे, सारिका रोकडे, प्रियंका कमाने, रिता खोब्रागडे या सर्व सखींना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक तालुका संयोजिका शिवानी काटकर यांनी तर संचालन प्रा. अर्चना सार्वे यांनी केले. आभार श्रद्धा काटकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी आभास रेस्टॉरंट मानेगाव (सडक) हेमंत देंगे व वैशाली ढेंगे, आदित्य झेरॉक्स सेंटर लाखनी, सुरेश वाघमारे व उज्ज्वला वाघमारे,
नितीन काटकर व श्रद्धा काटकर यांचे सहकार्य लाभले