लाखनी येथील रहिवासी असलेले जयकृष्ण आकरे हे पहेला येथील बीज गुणन प्रक्रिया केंद्रात कृषी पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहेत. शेतीच्या समस्या आणि त्यावरील उपायांची त्यांना उत्तम जाण आहे. पिढीजात शेतकरी असलेले जयकृष्ण उच्चशिक्षित असून त्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा दिलेल्या आहेत. त्यात यश न आल्यामुळे त्यांनी काही वर्षे खासगी नोकरीसुद्धा केली. त्यानंतर शेतीत आवड असल्यामुळे त्यांनी कृषी पर्यवेक्षक पदाची नोकरी स्वीकारली. आज ते या नोकरीत समाधानी आहेत.
प्रख्यात सिनेअभिनेते सचिन खेडेकर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. मंगळवारी एका वाहिनीवर जयकृष्ण आकरे यांच्या खेळाचे सादरीकरण झाले. एक-एक करीत त्यांनी ११ प्रश्नांची अचूक उत्तरे देत ६ लाख ४० हजार रूपये जिंकले. त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या तिन्ही लाइफलाइन संपल्यामुळे त्यांनी धोका न पत्करता बाहेर पडणे पसंत केले. त्यानंतरही त्यांना प्रश्नाचे उत्तर निवडण्यास सांगण्यात आले. तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर अचूक होते; परंतु आधीच खेळाबाहेर पडल्याने ही संधी हुकली. आणखी एखादी लाइफलाइन असती तर त्यांनी १२ लाख ५० हजार रूपये जिंकले असते. भंडारा जिल्ह्यातील प्रेक्षकांनी आवर्जून त्यांचा खेळ बघितला. आपल्या जिल्ह्यातूनही कोण होणार करोडपती या चुरशीच्या खेळात सहभागी होऊन लखपती झालेल्या जयकृष्ण आकरे यांचे अभिनंदन व कौतुक केले.
020921\img-20210831-wa0151.jpg
photo