नाना पटोले यांचे प्रतिपादन : तिरंगा यात्रेची सांगतातुमसर : तुमसर नगरी ही शहीदांची भूमी आहे. येथील सहा देशभक्त स्वातंत्र्याचा तिरंगा फडकवितांनी शहिद झाले होते, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.आजादी - ७० जरा याद करो कुर्बानी तिरंगा यात्रेच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. यात्रेचे नेतृत्व भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, आमदार चरण वाघमारे, माजी खासदार शिशुपाल पटले, प्रदीप पडोळे, निशिकांत ईलमे, कुंदा वैद्य, गीता कोंडेवार, विजय जायस्वाल, ललीत थानथराटे, बंडू बनकर, मुन्ना पुंडे, श्याम धुर्वे, प्रमोद घरडे, संतोश वैद्य, सुनिल लांजेवार, कैलाश पडोळे, शैलेश मेश्राम, लक्ष्मीकांत सलामे, शोभा लांजेवार, डॉ. गोविंद कोडवानी, अॅड. विजय पारधी, अमित चौधरी, डॉ. चंद्रशेखर भोयर, विक्रम लांजेवार, दिपेश पडोळे, नवनाथ मेश्राम, अमर टेंभरे, नंदू रहांगडाले यांनी केले.तुमसरचे स्वातंत्र संग्राम सैनिक भिवाजी अंबुले, विश्वनाथ भाजीपाले यांच्या शाल व श्रीफळ देऊन खासदार पटोले व आमदार वाघमारे यांनी सत्कार केला. संचालन प्रमोद घरडे तर आभार ललीत शुक्ला यांनी केले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यात्रकरिता हुकूमचंद साखरवाडे, टी. बी. कोरडे, एजाज सैय्यद, मतिनभाई, शेखर बिसन, सचिन बोपचे, युसूफ शेख, राजू गायधने, गौरव नवरखेडे, दिपक साकुरे, अनिल साठवणे, कैलास सेलोकर, अमित कुरंजेकर, नितेश साकूरे, सविता शर्मा, लक्ष्मी गभने, रिना माटे, पंकज बालपांडे, कुंडलिक वाघमारे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
तुमसर नगरी शहिदांची भूमी
By admin | Published: August 21, 2016 12:35 AM