लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : पाल्यावर तुमसर वनविभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कक्ष क्रमांक ८४ मध्ये अंदाजपत्रकीय ८ लाख ३७ हजार रुपये खर्चून सिमेंट नाला बंधाºयाचे बांधकाम करण्यात आले. परंतु बंधाºयाच्या पाणी साठविण्याचे जागी मोठ्या प्रमाणात मलबा साठून असल्याने बंधारा कोरडा दिसून आला. याप्रकरणी चौकशीची व कारवाईची मागणी केली होती. वनविभागाने चौकशी करून सत्य दिसून येताच कंत्राटदाराकडून नाल्यातील माती काढण्याचे काम पूर्ण केले.जलयुक्त शिवार योजना पाण्याचा साठा निर्माण व्हावा, भूगर्भातील पातळी वाढावी व पाणी टंचाई दूर व्हावी, या उद्देशाने कार्यान्वीत करण्यात आली. परंतु शासनाच्या व विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला हरताळ फासण्याचे काम डोंगरदेव सिमेंट नाला बांध प्रकरणी झाल्याचे दिसून आले. तुमसर वनविभागाच्या अधिकाºयांनी सिमेंट नाला बांध बंधाºयाचे बांधकाम होतेवेळी कोणत्याही प्रकारचे सनियंत्रणाचे काम नसल्याने परिणामी बंधाºयाच्या ठिकाणी पाणी न साठविता बंधाºयाच्या पोटात मातीच साठविलेली दिसून आली. शेतकºयांचे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय या वर्षात होणार नाही. वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी भटकंती नागरिकांसाठी व शेतकºयांसाठी डोकेदुखी वाढविणारी ठरणार असल्याचे मत इंजि. अंकुश बोंदरे यांनी यावेळी व्यक्त केले.सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेतून डोंगरदेव तिर्थस्थळाजवळ सिमेंट नाला बांधचे बांधकाम तुमसर वनविभागाच्या देखरेखीखाली सुरु करण्यात आलेल्या बंधाºयासाठी अंदाजपत्रकीय ८ लाख ३७ हजार ७२० रुपये खर्ची घालण्यात आले. परंतु या बंधाºयाचा वन्यजीवांना कोणताही उपयोग यावर्षी होणार नाही. बंधाऱ्यात नावालाही पाणी साठविलेला नाही. बंधाऱ्याचे बांधकाम करताना खोदकामात निघालेली माती बंधाºयाच्या काठावर वरच्या दिशेने न टाकता नाल्यातच टाकण्यात आली.प्रकरणाची माहिती भंडारा वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक यांना देण्यात आली असता त्यांनी चौकशी केली. चौकशीत तथ्य आढळून आल्याने तुमसर वनविभागाच्या अधिकाºयांनी कंत्राटदाराकडून माती काढण्याचे काम करवून घेतले.यामुळे निदान पुढच्या वर्षी शेतकरी व वन्यजीवांची तहान भागविली जाणार आहे. नागरिकांनी याप्रकरणी वृत्त प्रकाशित करून वनविभागाला कळविल्याबद्दल लोकमतचे आभार मानले आहे.
अखेर डोंगरदेव बंधाऱ्यातील मातीचा वनविभागातर्फे उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 9:29 PM
पाल्यावर तुमसर वनविभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कक्ष क्रमांक ८४ मध्ये अंदाजपत्रकीय ८ लाख ३७ हजार रुपये खर्चून सिमेंट नाला बंधाºयाचे बांधकाम करण्यात आले. परंतु बंधाºयाच्या पाणी साठविण्याचे जागी मोठ्या प्रमाणात मलबा साठून असल्याने बंधारा कोरडा दिसून आला. याप्रकरणी चौकशीची व कारवाईची मागणी केली होती. वनविभागाने चौकशी करून सत्य दिसून येताच कंत्राटदाराकडून नाल्यातील माती काढण्याचे काम पूर्ण केले.
ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजना : लोकमतच्या वृत्तानंतर प्रशासनाची दखल