शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

‘लाेकमत’च्या रक्तदान महायज्ञाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 5:00 AM

लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती दिनानिमित्त लोकमत समूहातर्फे आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या निमित्ताने रक्तदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचेल. रक्तदान हे खरंच एखाद्याला जीवन देण्यासारखं अनन्यसाधारण कर्तव्य आहे. सेवाभाव जपणारी ही माेहिम असल्याचे रक्तदान शिबिराचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.

ठळक मुद्देअनेकांनी स्वेच्छेने केले रक्तदान : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची जयंतीनिमित्त उपक्रम

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  लोकमतचे संस्थापक-संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंती दिनानिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान महायज्ञाला शुभारंभ करण्यात आला. बाबूजींच्या स्मृती दिनानिमित्त राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान करून लोकमतच्या या मोहिमेत मोलाचा सहभाग नोंदविला. मोहिमेचा शुभारंभ भंडारा येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात करण्यात आला. श्रद्धेय बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण,  दीपप्रज्वलन व फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार डॉ. परिणय फुके, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रियाज फारुकी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, आयएमएचे अध्यक्ष डॉ. नितीन तुरस्कर, प्राचार्य डॉ. विकास ढोमणे,  प्रा. डॉ. कार्तिक पनिकर, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, डॉ. राजेश कापगते, डॉ. वैशाली गोमकाळे, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मीरा सोनवने, हुसैन फिदवी, यशवंत सोनकुसरे,  सुरेश राऊत, महेंद्र निंबार्ते, राजेश राऊत, आशिष दलाल, प्रवीण उदापुरे, भरत मल्होत्रा, कुणाल न्यायखोर, जॅकी रावलानी, दीप्ती भुरे, कविता लांजेवार, लोकमत जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी शशीकुमार वर्मा, जिल्हा कार्यालय प्रमुख मोहन धवड, प्रतिनिधी इंद्रपाल कटकवार, विनोद भगत, सखी मंचच्या जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार, बाल विकास मंचचे जिल्हा संयोजक ललित घाटबांधे आदी उपस्थित होते. उपस्थित अतिथींनी रक्तदानाबाबत मोलाची माहिती देत या मोहिमेला शुभेच्छा दिल्या.  संचालन ललित घाटबांधे यांनी तर आभार प्रा. भोजराज श्रीरामे यांनी मानले. रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. मीरा सोनवणे, सीमा तिजारे, सुरेखा भिवगडे, विशाल गायकवाड, राजू नागदेवे, लोकेश गोटेफोडे, राहुल गिरी, मनीष दयाल, प्रिया मेश्राम, मयूर खोब्रागडे, पल्लवी अतकरी याशिवाय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. भीमराव पवार, प्रा. प्रशांत वालदेव, डॉ. वीणा महाजन, प्रा. जितेंद्र किरसान, डॉ. रोमी बिष्ट आदींनी सहकार्य केले.रक्तदान करणाऱ्या दात्यांना प्रमाणपत्र, स्वेच्छीक रक्तदान कार्ड आणि बॅग भेट देण्यात आली. लाेकमतच्यावतीने जिल्हाभर रक्तदान शिबिर आयाेजित करण्यात येणार आहे. ६ जुलै राेजी साकाेली, ८ जुलै पवनी, १० जुलै लाखनी, १३ जुलै माेहाडी, १५ जुलै तुमसर आणि १७ जुलै राेजी लाखांदूर येथे रक्तदान शिबिर आयाेजित करण्यात आले आहे.

रक्तदानाचे महत्व लाेकांपर्यंत पाेहचेल - सुनील मेंढेलोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती दिनानिमित्त लोकमत समूहातर्फे आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या निमित्ताने रक्तदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचेल. रक्तदान हे खरंच एखाद्याला जीवन देण्यासारखं अनन्यसाधारण कर्तव्य आहे. सेवाभाव जपणारी ही माेहिम असल्याचे रक्तदान शिबिराचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.अनेकांचे जीव वाचतील - नरेंद्र भाेंडेकरलोकमतच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबविले जातात. माणूस जोडण्याची कला या संस्थेने चांगली जपली आहे. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या माध्यमातून अधिकाधिक संबंध दृढ होतील. कोरोना महामारीने आपल्याला बरेच काही शिकविले. या रक्तदान मोहिमेतून संकलित केल्या जाणाऱ्या रक्त पिशवीतून अनेकांचे जीव वाचविले जातील, यात शंका नाही, असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.

लाेकमतच्या उपक्रमाने जीवनरक्षक बनण्याची संधी -नितीन तुरस्करकोरोना संक्रमण काळात रक्ताची खूप गरज भासली. निरोगी आणि सुदृढ व्यक्तीला रक्तदान करता येते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण व आपली रोगप्रतिकार क्षमता उत्तम असल्यास रक्तदान करताना घाबरू नये. लोकमतच्या या उपक्रमामुळे रक्तदात्यांना जीवरक्षक बनण्याची  संधी उपलब्ध झाली आहे, असे आयएमए चे अध्यक्ष डॉ. नितीन तुरस्कर यांनी सांगितले.

काेराेनात रक्तदान माेहीम महत्वाची - संदीप कदमकोरोना महामारीच्या काळात रक्ताची अधिक गरज आहे. आपण औषधे, ऑक्सिजन उपलब्ध करू शकतो, मात्र रक्ताचे तसे नाही. म्हणून ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही मोहीम खूप महत्त्वाची वाटते. उल्लेखनीय म्हणजे राज्यभरात ही मोहीम राबविली जाणार असल्याने विक्रमी रक्त पिशवी संकलनाची नोंद होईल, अशी मला आशा आहे. लोकमतने या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. अशा उपक्रमाची खऱ्या अर्थाने गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी  संदीप कदम यांनी केले.रुग्णांसाठी शिबिर नवसंजीवनी - रियाज फारुकीराज्यात रक्ताचा तुटवडा भासत असतो. रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही. अशा वेळी समस्या वाढत असते. रक्त मिळविण्यासाठी नातेवाइकांची धावपळ होत असते. अशा अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून केले जाणारे रक्त संकलन निश्चित रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरेल. रक्तदानाबाबत कुठलाही गैरसमज कोणीही करून घेऊ नये, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रियाज फारुकी यांनी सांगितले.

रक्तदान करुन यांनी जाेपासली सामाजिक बांधिलकी- ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेत रक्तदान करणाऱ्यांमध्ये सतीश कोरे,  योगेश जीभकाटे, निखिल खापर्डे, नीलिमा दास, पूजा पारस्कर, सिद्धांत गजभिये, मनोहर गभणे,  प्रशांत भोले, राजन वलके, कैलास खोब्रागडे, राजकुमार लिंगायत, आदेश वैद्य, वैशाली गोमकाळे, हर्षा केवट, चंद्रप्रकाश तरारे, शरद भाजीपाले, चंद्रशेखर लिमजे, ज्ञानेश्वर खोब्रागडे, हर्षल मडामे, साहिल किंदर्ले, अकलेश काळबांधे, मुकेश मंत्री,  अजय कारेमोरे, संचित निनावे, निष्ठा निनावे, रमेश चकोले, मंजूषा चव्हाण, उत्सव सक्सेना, राकेश शहारे, वसंता माटुरकर, मस्तानी मोहम्मद, गायत्री भुरे, फैजान खान, हुसैन फिदवी, इंद्रपाल कटकवार, संजय धकाते यांनी स्वेच्छेने रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जपली.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट