लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खाजगी वाहतुकदाराकडून जास्त दरात प्रवाशांना प्रवास करावा लागत होता, त्यावर तोडगा म्हणून शासनाने परिवहन महामंडळातर्फे सर्व सुविधायुक्त अशी वातानुकूलित शिवशाही बससेवा भंडारा- नागपूर-भंडारा सुरु करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करण्याची सेवा मिळणार आहे. विदर्भात नव्याने सुरु करण्यात आलेल्या या सेवेचा शुभारंभ भंडारा आगारातून होत असल्याचे राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.शिवशाही वातानुकूलित बससेवेच्या शुभारंभाप्रसंगी आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. प्रारंभी खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते शिवशाही बससेवेचा फित कापून शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बसची पाहणी करून वातानुकूलित सुविधा व इतर बाबींची पाहणी केली.या शिवशाही बससेवेमुळे केवळ एक तासात नागपूर ते भंडारा दरम्यानचा प्रवास होणार असून ही सेवा निमआराम असून ही बस विना वाहक असणार आहे. याच धर्तीवर राज्यात १०० बसेस धावणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही सेवा कोणत्याही स्पर्धेत टिकणार आहे. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, वायफाय सेवा अंतर्भुत असून आरामदायी असल्याचे सांगितले. अधिकाधिक सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.भविष्यात या सेवेकडे प्रवाशांचे प्रमाण वाढणार आहे. आगार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कामास सुरुवात होणार असून यामुळे होणाºया चोरी व लुबाडणूकीच्या प्रकरास आळा बसणार असल्याचे सांगितले.यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, विभागनियंत्रक गजानन नागुलवार, सहाय्यक वाहतुक अधीक्षक एस.पी. लिमजे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व रापमंचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आचारसंहितेचे उल्लंघन -चरण वाघमारेभंडारा : जिल्ह्यात ३६२ ग्रामपंचायतीची निवडणुका असल्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. त्यात भंडारा शहरसुद्धा समाविष्ठ आहे, असे असताना शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनी भंडारा शहरात येऊन राज्य परिवहन विभागाच्या शिवशाही बसचा लोकार्पण केला. वास्तविकता या कार्यक्रमाला जिल्ह्यात एखादा शासकीय कार्यक्रम घ्यावयाचे असल्यास तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील स्थानिक आमदारांना याचे निमंत्रण देणे अगत्याचे आहे. तसे प्रोटोकॉलनुसार शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण देणे आवश्यक आहे. परंतू जिल्ह्यात आचारसंहिता असल्याने असे शासकीय कार्यक्रम घेता येत नसल्याने तसेच अशा कार्यक्रमांची परवानगीही जिल्हाधिकाºयांकडून दिली जात नाही. परंतु तरीही शिवसेनेच्या मंत्र्यांनी आचारसंहिता असलेल्या जिल्ह्यात येऊन शिवशाही बसचा लोकार्पण या शासकीय कार्यक्रमाचा लोकार्पण करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. याची दखल निवडणूक विभागाने घेण्याची गरज आहे. आचारसंहिता लागू असताना शासकीय कार्यक्रमासाठी परवानगी दिली जात असेल तर आम्हालाही भाजपच्या मंत्र्यांना बोलावून करण्याची परवानगी जिल्हाधिकाºयांनी द्यावी, आचारसंहितेचा उल्लंघन करणाºया मंत्र्यांवर या कार्यक्रमाची दखल घेऊन योग्य कार्यवाही व्हावी, अशी मागणी आ. चरण वाघमारे यांनी केली.
विदर्भात भंडारा आगारातून शिवशाही बससेवेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 12:56 AM
खाजगी वाहतुकदाराकडून जास्त दरात प्रवाशांना प्रवास करावा लागत होता, त्यावर तोडगा म्हणून शासनाने परिवहन महामंडळातर्फे सर्व सुविधायुक्त अशी वातानुकूलित शिवशाही बससेवा भंडारा- नागपूर-भंडारा ......
ठळक मुद्देपरिवहन मंत्री दिवाकर रावते : प्रवाशांच्या सुविधेसाठी शिवशाही बससेवा सुरु, महिला वाहक करुणा गोंडाणे हिचा सत्कार