शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

आंबेडकरी चळवळीत कार्यकर्त्यांपेक्षा नेते अधिक

By admin | Published: February 06, 2016 12:43 AM

मागील साडेतीन हजार वर्षांपासून भारतात असमानतेतून अस्पृश्यता सुरु होती़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी चळवळ उभी केली़ डॉ़आंबेडकरांचे नेतृत्व होते, ..

मिनी दीक्षाभूमीचा वर्धापन दिन : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे प्रतिपादनभंडारा : मागील साडेतीन हजार वर्षांपासून भारतात असमानतेतून अस्पृश्यता सुरु होती़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी चळवळ उभी केली़ डॉ़आंबेडकरांचे नेतृत्व होते, तोपर्यंत ही चळवळ जोमाने संपूर्ण भारतात सुरु होती़ परंतू डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिवार्नानंतर अपेक्षित समानतेची चळवळ चालवण्याची गरज असताना कार्यकर्त्यांपेक्षा नेते अधिक झाल्याची खंत जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी व्यक्त केली.यावेळी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सव वर्ष २०१६ निमित्त बुध्दविहार समिती सिल्लीद्वारा नवनिर्मित मिनी दिक्षाभूमी प्रतिकृतीचे द्वितीय वर्धापन दिन व माई रमाई जन्मोत्सव सोहळयाचे आयोजन बुध्दविहार परिसरात करण्यात आले होते़ त्यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी नुरचंद पाखमोडे होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, उपविभागीय अधिकारी प्रभाकर भोयर, विकास अधिकारी सत्येंद्र तामगाडगे, प्रा़ बबन मेश्राम, प्राचार्य अनमोल देशपांडे, सुर्यकांत हुमणे, सरपंच दुलीचंद देशमुख, फुंडलिक तिरपुडे, कार्तीक मेश्राम उपस्थित होते.बुध्दविहार समितीच्यावतीने जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना गौतम भगवान बुध्द यांची पूणार्कृती मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले़ त्यानंतर गुणवंत विद्यार्थी समृध्दी किरण मेश्राम, ईशान ईश्वर गोस्वामी, समिक्षा नंदकिशोर मेश्राम, रूचि मेश्राम, अभिलाष महेंद्र मेश्राम, रजत प्रभाकर सुर्यवंशी, आशुतोष कुंदन मेश्राम यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रत व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले़ राात्री आकाशवाणी कलावंत परमानंद भारती, संविधान भारती, अश्विनी राजगुर (अमरावती), विजय भारती, प्रबोध किर्ती, सुनिता सरगम यांचा भिमबृध्द गीतांचा महासंग्राम कार्यक्रम प्रसिध्द गीतकार, संगीतकार केशव गजभिये यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रास्ताविक विलास खोब्रागडे यांनी केले. संचालन प्रा़ बबन मेश्राम यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य अनमोल देशपांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी बुध्दविहार समिती सिल्ली, रमाई महिला मंडळ सिल्ली, कार्यकर्ते, नागरीकांनी सहकार्य केले़. (नगर प्रतिनिधी)