लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वपक्षियांनी केलेली बंडखोरी मोडीत काढून अधिकृत उमेदवाराच्या विजयाचा मार्ग सोपा करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी गत तीन दिवसांपासून प्रयत्न चालविले आहे. मात्र बंडखोरांना थंड करताना नेत्यांची दमछाक होत असल्याचे तुमसर आणि भंडारा विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. सोमवार हा नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. कोण नामांकन मागे घेणार याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघात ७० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी चार अर्ज छाणनीत अवैध ठरविण्यात आले. आता ६६ उमेदवार कायम आहेत. त्यात तुमसर १५, भंडारा २५ आणि साकोलीतील २६ उमेदवारांचा समावेश आहे. तुमसर आणि भंडारा मतदार संघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांचे बंड रोखण्यासाठी वरिष्ठ छाननीच्या दिवसांपासून प्रयत्न करीत आहे. परंतु अद्याप त्यांना यश आल्याचे दिसत नाही.भंडारा जिल्ह्यातील भाजपच्या तिनही आमदारांचे तिकीट पक्षाने कापले. ऐनवेळेवर तिकीट कापल्याने या आमदारांनी आपल्या मतदारसंघात नामांकन दाखल केले. तुमसर आणि भंडाराच्या आमदारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. तर साकोलीचे आमदार राजेश काशीवार यांनी भाजपतर्फे नामांकन दाखल केले होते. छाननीत एबी फार्म अवैध ठरविण्यात आला. मात्र तुमसर आणि भंडारात बंडखोरी कायम आहे. तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांचे नामांकनाच्या शेवटच्या दिवशी तिकीट कापले. त्यांनी शक्तीप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. भाजपच्या अधिकृत उमेदवारासाठी आमदार वाघमारे धोक्याची घंटा ठरु शकतात. त्यामुळे त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्न सुरु आहे. रविवारी रात्रीपर्यंत तरी त्यात यश आले नव्हते.यासोबतच तुमसर विधानसभा मतदार संघात माजी आमदार अनिल बावनकर, राष्टÑवादी शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे यांनी नामांकन दाखल केले आहे. त्यांनी राष्टÑवादीकडून उमेदवारीचा दावा केला होता. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. परिणामी त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. तसेच काँग्रेसच्या वाट्याची जागा राष्टÑवादीला गेल्याने डॉ. पंकज कारेमोरे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. आता राष्टÑवादी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून या बंडखोरांना शांत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. भंडारा विधानसभेत आमदार रामचंद्र अवसरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची उमेदवारी भाजपच्या उमेदवारासाठी धोक्याची ठरु शकते. त्यांनी नामांकन मागे घ्यावे यासाठी प्रयत्न सुरु आहे.तीन मतदार संघात ६६ उमेदवारी अर्ज कायम राहिले त्यात अनेक अपक्षांचा समावेश आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी अपक्ष उमेदवार अडचणीचे ठरु शकतात. थोडीथोडी मते या अपक्षांनी घेतली तरी अधिकृत उमेदवाराचे गणित बिघडू शकते. त्यामुळे अपक्षांना या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी युती आणि आघाडीकडून तिनही मतदारसंघात प्रयत्न सुरु आहे. बंडखोरांची बंडखोरी शांत करण्यासाठी नेत्यांची मोठी दमछाक होत आहे. विविध माध्यमातून बंडखोरांना थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकांना आमिष देवून उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.बंडखोर आणि अपक्ष नॉट रिचेबलनामांकन मागे घेण्यासाठी दबाव येण्याची शक्यता असल्याने दोनही मतदार संघातील बंडखोर आणि अपक्ष रविवारी नॉटरिचेबल होते. वरिष्ठ नेत्यांनी वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु यातील अनेकांचे मोबाईल स्विच आॅफ दिसत होते. काही बंडखोरांच्या आणि अपक्षांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्याचा नेत्यांकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र बहुतांश बंडखोरांची भेटच होऊ शकली नाही. आता रविवारच्या रात्रीतून नेतेमंडळी काय करतात आणि सोमवारी कोण आपली उमेदवारी मागे घेतो यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तुर्तास सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रतीक्षा करवी लागणार आहे.
बंडखोरी रोखताना नेत्यांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 12:42 AM
तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघात ७० उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी चार अर्ज छाणनीत अवैध ठरविण्यात आले. आता ६६ उमेदवार कायम आहेत. त्यात तुमसर १५, भंडारा २५ आणि साकोलीतील २६ उमेदवारांचा समावेश आहे. तुमसर आणि भंडारा मतदार संघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे.
ठळक मुद्देवरिष्ठांकडून प्रयत्न : आज नामांकन मागे घेण्याचा दिवस