भंडारा शहरातील आरटीओ ऑफिस ते मुजबीपर्यंतचा रस्ता अरुंद असून रस्त्याकडेला असलेल्या धोकादायक कडा तरी किमान भरा नाहीतर टोलवसुली बंद करा असे सांगत आहेत. अपघात घडल्यानंतरही महामार्गाच्या कडेला मुरूम थवा माती टाकण्यात आलेली नाही. गत काही दिवसांपासून वाहनधारकांची होणारी कसरत प्रशासनाला दिसत नाही का असा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत. महामार्गावर प्रवास करताना सुविधा मिळत नसल्याने नाहक अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र तरीही याकडे दुर्लक्ष कायम होत आहे. त्यामुळे लाखोंचे टोल वसुली जाते कुठे अशी चर्चा होत आहे. रस्त्याकडेला उंच सखल भागात असल्याने प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. एकीकडे पावसामुळे रस्ता खराब झाला आहे, तर दुसरीकडे रस्ता दुरुस्तीसाठी दुर्लक्ष केले जात असल्याने आणखी किती जणांना बळी जाणार असा प्रश्न केला जात आहे.
बॉक्स दुचाकीधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने अतिवेगाने धावतात. एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात व खड्डे चुकवण्याच्या नादात ही अवजड वाहने जणूकाही पाठीमागून आपल्याला धडकतात की काय या भीतीनेच दुचाकीधारकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे. दररोजचेच समस्या असतानाही याकडे ना महामार्ग पोलिसांचे लक्ष आहे, ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे. त्यांना रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, धोकादायक रस्ता डोळ्याने दिसत नाही का असा प्रश्नही आहे.
बॉक्स
राष्ट्रीय सुविधांचा महामार्गावर अभाव
राष्ट्रीय सुविधांचा सुविधांचा अभाव दिसून येत आहे. कधी पथदिव्यांची समस्या, तर बाराही महिने रस्ता दुरुस्ती होत नसल्याने पावसाळ्यात तर जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे. गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे साकोली ते भंडारा ते नागपूर मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता धोकादायक बनला असतानाही याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दुसरीकडे याच मार्गावर ठिकठिकाणी लाखोंची टोलवसुली केली जाते. लाखो रुपयांचा टोल नेमका जातो कुठे असा सवाल वाहनधारकांनी केला आहे. ट्रक चालकांनाही योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने टोल वसुली बंद करा, असा अशी मागणी आहे.