पंचभाई यांची मागणी : शेतकरी विकासापासून वंचित, रब्बी पिकाला पाण्याचा फटकाचिचाळ : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द इंदिरा सागर प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून शासनाने पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने आणि डाव्या कालव्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याने ते पूर्ण तोडण्यात आले. पूर्ववत नविन कंत्राटदारामार्फत बांधकाम कासवगतीने सुरु असल्याने या वर्षी शेतकऱ्यांना रब्बी हंगामाला पाण्यासाठी मुकावे लागणार आहे.पूर्व विदर्भातील मागासलेल्या भंडारा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील १ लक्ष ९० हजार हेक्टर कृषी जमिनीला सिंचनाची सोय असणाऱ्या गोसेखुर्द धरणामुळे पूर्व विदर्भात हरितक्रांती येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी लाखांदुर, साकोली, भंडारा तालुक्यातील एकूण २८७ गावांना लाभ होणार असून जिल्ह्यातील ६८ हजार हेक्टर कृषी जमिनीला सिंचन होणार आहे.गोसेखुर्द प्रकल्पाच्या पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम-सुफलाम करण्याची क्षमता असलेला मुख्य डाव्या कालव्याचा काम विदर्भ पाटंधारे विकास महामंडळ नागपुर गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प एआयबीपी अंतर्गत मुख्य विमोचन धरणाचे साझा क्र. ८२० मीटरवरुन सुरु असून कालव्याची एकूण लांबी २२.९३ किमी कालवा विसर्ग ४५ २२ घ. मी. सेकंद कालव्याचा तळ रुंदी १४.८८ कालव्याचा पूर्ण प्रवाह उंची २.७५ मी. कालवा मुक्तांतर ०.९५ मी कालवा तळ उतार ११००००, कालवा तळ पातळी २३८.०० मी. एकूण सिंचन क्षेत्र (प्रवाह) ३०४५९ ला लाभ घेता येणार आहे.प्रकल्पाचा मुख्य डावा कालवा, चिचाळ, आकोट, कोंढा, सोमनाळा, सेंद्री, मालची भावड आदी गावातून गेला आहे. सदर परिसरातील काळी कसदार, जमीन चौरास म्हणून ओळख आहे. त्यामुळे येथील शेतकरी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहु, कांदा, हरबरा, मृंग, उळीद, ज्वारी, लाख, लाखोरी, जवस आदी उत्पादन घेतो. मात्र कंत्राटदाराच्या कामातील संथ गतीने रब्बी हंगामाला पाण्याचा मोठा फटका बसला आहे.या वर्षाला वरुण राजाच्या वक्रदृष्टीने खरीप हंगामात पऱ्हे लावणी पासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने पऱ्हे ते रोवणी दरम्यान शेतकऱ्यांनी तळे, बोळी, विहिरीतील पाण्याद्वारे रोवणी केली. मात्र सर्वदुर पावसाने शेतकरी हतबल झाला. त्यावेळी प्रकल्पाचे पाणी सोडल्याने त्याचा लाभ काही कालव्या शेजारील शेतकऱ्यांना झाला.त्यामुळे कालव्या शेजारील शेतकऱ्यांनी कालव्याचे पाणी मिळेल या आशेने कांदा उत्पादन व गहू उत्पादनावर भर दिला पाणी तर मिळोलच नाही. मात्र उभे रब्बी पीक पाण्याअभावी कोमेजले आहेत. कालवा बांधकाम कंत्राटदार ५ ते ६ वर्षापासून कासवगतीने करीत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना गहू, हरबरा, उळीद, कांदा आदी पिकांना फटका बसला आहे. शेतकरी दुष्काळाच्या खाईत पडला आहे. संबंधित विभागाने जातीने लक्ष देवून कालव्यात पाणी सोडण्याची मागणी तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. (वार्ताहर)
डाव्या कालव्यात पाणी सोडा!
By admin | Published: February 16, 2017 12:27 AM