संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी यासाठी कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प उभा करण्यात आला. तब्बल २३ वर्षानंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून यावर्षी या प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतीला सिंचनाची सोय होणार असून शेतकऱ्यांच्या हरित क्रांतीचे स्वप्न पुर्ण होणार आहेत.निम्न चुलबंद प्रकल्पाच्या महाराष्टÑ शासन पाटबंधारे विभागाकडून दि. २९ एप्रिल १९९५ रोजी अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तेव्हापासून या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरु होते. तब्बल २३ वर्षानंतर या प्रकल्पाचे काम पुर्णत्वास आले असून १२ बाय ६ मीटरचे ७ दरवाजे बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पातून साकोली तालुक्यातील २३ गावातील ५ हजार ९९७ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.सद्यास्थितीत या प्रकल्पातुन यावर्षी फक्त शिवणीबांध, कुंभली, खंडाळा व सावरबंध या गावच्या तलावात पाणी सोडण्यात येणार असून पुढच्या वर्षी साकोली, पाथरी व बोधरा या तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी कालव्याची सोय करण्यात आली आहे.या प्रकल्पामुळे साकोली तालुक्यातील कुंभली, धर्मापुरी, सावरबंध, बोंडे, खंडाळा, वडद, सुकळी, महालगाव, शिवणीबांध, साखरा, वटेश्वर, सासरा, न्याहारवाणी, कटंगधरा, विहीरगाव, गडकुंभली, सेंदुरवाफा, पाथरी, खैरलांजी, साकोली, जमनापुर, पिंडकेपार, बोथरा या २३ गावांच्या शेतीच्या सिंचनाची सोय होणार आहे. या प्रकल्पासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले असून ज्या गतीने या प्रकल्पाचे काम व्हायला पाहिजे होते त्या गतीने या प्रकल्पाचे काम झाले नाही. या प्रकल्पाची किंमत वाढून अंदाजपत्राकनुसार या प्रकल्पाची किंमत चारपट वाढवून या प्रकल्पाच काम २३ वर्षात पूर्ण करण्यात आले.भिमलकसा प्रकल्पही लवकरचयावर्षीच्या वडेगाव येथील भिमलकसा प्रकल्पाचे भुमीपूजन करण्यात आले. तेव्हापासून या प्रकल्पाचे काम सुरु होते. मात्र पाऊस आल्याने काम बंद करण्यात आले. उर्वरित काम पावसाळा संपताच करण्यात येणार असून लकवरच हा ही प्रकल्प पूर्ण होईल.पाणीपुरवठा योजनेचे काय?निम्न चुलबंद प्रकल्पावर आधारित साकोली, लाखनी तालुक्यातील गावासाठी शुध्द पाणीपुरवठा योजना साकोली येथे पुर्ण करण्यात आली. मात्र सदर योजना जिल्हा परिषदेने घेण्यास नकार दिल्याने ही योजना बंद पडली आहे. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले तर दुसरीकडे नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागते.साकोली तालुक्यात शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. मात्र ही शेती निसर्गावर आधारित होती. त्यामुळे शेतीतुन उत्पादन निघेलच याचा नेम नाही. त्यामुळे सिचंनाची सोय होणे गरजेचे होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारवार भेटून निम्न चुलबंद प्रकल्प व भिमलकसा प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीची मागणी करुन हे दोन्ही प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळे नक्कीच साकोली तालुक्यात हरितक्रांती येईल व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.- बाळा काशीवार, आमदारनिम्न चुलबंद प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून यावर्षी लवकरच या प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार असून या पाण्याची सिंचनासाठी सोय होणार आहे. यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी आहे.- अमोल चोपडे, उपविभागीय अभियंता
निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी तलावात सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:19 PM
तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी यासाठी कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प उभा करण्यात आला. तब्बल २३ वर्षानंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून यावर्षी या प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतीला सिंचनाची सोय होणार असून शेतकऱ्यांच्या हरित क्रांतीचे स्वप्न पुर्ण होणार आहेत.
ठळक मुद्दे२३ वर्षानंतर बांधकाम पूर्णत्वास : १९९५ ला मिळाली होती प्रशासकीय मान्यता