आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा तसेच आर. एम. पटेल महिला महाविद्यालय, रोसेयो विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आर.एम.पटेल महिला महाविद्यालय, भंडारा येथे ‘विक्टीम्स् आॅफ ट्राफिकींग अॅण्ड कमेरिकल सेक्सूअल एक्सप्लोटेशन शेम २०१५’ या विषयावर विधी साक्षरता शिबीर कार्यक्रम पार पडले.अध्यक्षस्यानी प्रमख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय आ. देशमुख हे होते. कार्यक्रमाला तज्ञ वक्ते सह दिवाणी न्यायाधिश (वरीष्ठ स्तर) एस. जे. भट्टाचार्य, प्राचार्या डॉ. रंजना शृंगारपुरे रासेयो विभाग प्रमुख अधिकारी, प्रा. किशोरदत्त पाखमोडे, हिंदी विभाग प्रमुख मधुलता व्यास, अधिक्षक डी. आर. भुरे, वरिष्ठ लिपीक जी. जी. कडव, कनिष्ठ लिपीक मोरेश्वर नंदनवार, शिपाई राजेश गोन्नाडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे तज्ञ वक्ते एस. जे. भट्टाचार्य यांनी ‘विक्टीम्स् आॅफ ट्राफिकींग अॅण्ड कमेरिकल सेक्सूअल एक्सप्लोटेशन शेम २०१५’ याअंतर्गत समाजात जीवन जगतांना मुलींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपण समाजात वावरतांना अनेक प्रकारच्या तस्करी पाहतो. पण आज समाजात लैगिक समस्या मोठया प्रमाणात आपल्याला दिसून येते. त्यामुळे आज अत्याचारात वाढ झाली आहे. त्यामुळे आज कायदयाची माहिती आपल्याला होणे आवश्यक आहे. असे मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ. रंजना शृंगारपुरे यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलींनी समस्याचा सामना करतांना घाबरू नये. प्रत्येक समस्यांचा खंबीरपणे सामना करावा. आज आपल्यात सामना करण्याची ताकद आहे. त्यामुळे जिजाबाईनी जस शिवाजीला खंबीर बनवले त्याच प्रमाणे तुम्ही खंबीर व्हा. असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी, मानवी जीवनात विवेक, आणि सत्य या गोष्टीना फार महत्व आहे. तसेच विद्यार्थ्यानी आत्मविश्वासाने कोणत्याही संकटाना सामोरे जावे. यासाठी स्वत:चे उदाहरण देवून ते वाईट परिस्थितीतून बाहेर येवून विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत कसे आले हे विद्यार्थ्याना सांगून मानवात असलेली राक्षसी प्रवृत्ती स्त्रियांसाठी किती घातक आहे यासाठीच आज स्त्रियांसाठी मोठया प्रमाणात कायदे करण्यात आले. महिलांचे संरक्षण करणारी प्रभावशाली आय.पी.सी. कलम १०० याचे महत्व उदाहरणासह सविस्तरपणे समजावून सांगितले.संचालन मोरेश्वर नंदनवार यांनी तर आभार डॉ. मधुलता व्यास यांनी मानले.
विद्यार्थिनींसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:36 PM
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा तसेच आर. एम. पटेल महिला महाविद्यालय, रोसेयो विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आर.एम.पटेल महिला महाविद्यालय, भंडारा येथे ‘विक्टीम्स् आॅफ ट्राफिकींग अॅण्ड कमेरिकल सेक्सूअल एक्सप्लोटेशन शेम २०१५’ या विषयावर विधी साक्षरता शिबीर कार्यक्रम पार पडले.
ठळक मुद्देउपक्रम : आर. एम. पटेल महिला महाविद्यालयात चर्चा