शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

डोंगरदेव शेतशिवारात पट्टेदार वाघाच्या पाऊलखुणा

By admin | Published: January 06, 2016 12:35 AM

कोका वन्यजीव अभयारण्याशेजारील डोंगरदेव येथील शेतशिवारात पट्टेदार वाघ सोमवारला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दिसून आला.

करडी (पालोरा) : कोका वन्यजीव अभयारण्याशेजारील डोंगरदेव येथील शेतशिवारात पट्टेदार वाघ सोमवारला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दिसून आला. डोंगरदेव नाल्याच्या बाजूने आलेल्या वाघाचे पदचिन्ह मिरचीच्या शेतात दिसून आले. या पाऊलखुणामुळे शेतकऱ्यांत भीती पसरली आहे. दुसरीकडे पट्टेदार वाघ बेपत्ता अल्फा वाघीण तर नाही ना? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. कोका अभयारण्यातील अल्फा नामक वाघीण आॅक्टोबर २०१५ पासून बेपत्ता आहे. तिची तिन्ही बछडे अभयारण्यात सुरक्षित आहेत. परंतु अजूनपर्यंत तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. याबाबत वनाधिकाऱ्यांना विचारले तर शोधाशोध सुरु असल्याचे सांगण्यात येते. या वाघिणीच्या शोधासाठी जंगल परिसरात कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र ती एकाही कॅमेऱ्यात दिसून आली नाही. मध्यंतरी माटोरा परिसरात एका वाघाचे पदचिन्ह आढळून आले होते. त्यावेळी ती ‘अल्फा’च असल्याचे वनाधिकारी सांगत होते. परंतु अधिकृतरित्या अद्याप सांगितले नाही. ३ जानेवारीला रात्रीच्या १०.३० वाजताच्या सुमारास डोंगरदेव शेतशिवारात एका पट्टेदार वाघाला पाहण्यात आले. डोंगरदेव शिवारातील बंडू बारापात्रे या शेतकऱ्याच्या शेतात रात्री तो वाघ डोंगरदेव नाल्याच्या बाजूने आला. वाघ मिरचीच्या शेतात शिरताच शेतातील कुत्र्यांनी आरडाओरड केली. पहारेकऱ्याने उठून पाहिले असता तो वाघ मिरचीच्या शेतातून पुन्हा नाल्याच्या दिशेने निघून गेल्याचे सांगितले. मिरचीच्या शेतात वाघाच्या पाऊलखुणा जशाच्या तशाच आहेत. (वार्ताहर)