लोकमत न्यूज नेटवर्क करडी / पालोरा : केसलवाडा गट ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या ३० लोकसंख्येचे असलेले लेंडेझरी गावामध्ये ग्रामपंचायतकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली नाही. येथील नागरिकांना पाच महिन्यांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
लेंडेझरी गाव केसलवाडा गट ग्रामपंचायतीला जोडला असल्यामुळे सरपंच यांनी चार वर्षे लोटूनही आजपर्यंत लेंडेझरी गावाला भेट दिली नाही. अथवा गावातील समस्यांकडे लक्ष दिले नाही. उन्हाळ्यापासून लेंडेझरी येथील नागरिकांना तीन कि.मी. अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीला पाण्याच्या व दिवाबत्ती बाबतीत पत्रव्यवहार केला. आजपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात आलेली नाही.
दूषित पाणी पिण्याची वेळशुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. समस्या गंभीर असताना स्थानिक प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.
प्रशासन काळजी घेणार?ग्रामपंचायतीमार्फत दीड हजार रुपये पाण्याचे देत असून, पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. प्रशासन काळजी घेत असल्याचे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे.
याकडेही लक्ष द्या नागरिकांना पाण्याची सोय व गावातील दिवाबत्तीची सोय करण्यात यावी, अशी मागणी फुलचंद मडावी, विनोद सोनवाने, विश्वास मडावी, कुंडलिक मेश्राम, रणजित उके, मटू नारनवरे, सुनील नेवारे, गंगाबाई वायरे, सुनीता मेश्राम, पर्मिला सोनवणे, शीलाबाई मडावी यांनी केली आहे.
ग्रामपंचायतींतर्गत आहे आरोग्रामपंचायतींतर्गत आरो असून, सहा महिन्यांपासून बंद पडलेला आहे. बाहेर पाणी वापरण्यासाठी मिळत आहे, परंतु ते पाणी पिण्याचा उपयोगी नाही. उपसरपंच राजेंद्र शेंद्रे यांनी प्रत्येक मासिक सभेत पाण्यासंबंधी विषय मांडत असून, सरपंच व ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष केले जात आहे. आरो प्लान्ट दुरुस्ती करण्यात आले नाहीत. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खासगी बोअरवेचा पाणी उपलब्ध करून दिले"केसलवाडा व लेंडेझरी पं. गट ग्रामपंचायत असल्यामुळे लेंडेझरी गावात ९ कुटुंब राहत असून, पाण्याचा आरो लावण्यात आले आहे. परंतु आरो प्लॅन्ट बिघडले असल्यामुळे एका खासगी बोअरवेचा पाणी उपलब्ध करून देण्यात आले."- पंकज काटेखाये, ग्रामसेवक, केसलवाडा