शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

भंडारा जिल्ह्यात अंगणात आढळले बिबट्याच्या पावलाचे ठसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 5:02 PM

Bhandara News घराच्या अंगणात तब्ब्ल आठ ते दहा लहान-मोठे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. वनविभागाने गावात धाव घेतली व​​​​​​​ रात्री-अपरात्री गावाबाहेर फिरू नये, असा इशारा दिला.

ठळक मुद्देमहिनाभरापूर्वी बिबट्या झाला होता कॅमेऱ्यात ट्रॅप

 लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : घराच्या अंगणात तब्ब्ल आठ ते दहा लहान-मोठे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. वनविभागाने गावात धाव घेतली व रात्री-अपरात्री गावाबाहेर फिरू नये, असा इशारा दिला. महिनाभरापूर्वी याच परिसरात बिबट आणि बछडा आढळून आला होता. पवनी तालुक्यातील चकारा येथील प्रमोद कोचे यांच्या घराच्या अंगणात शुक्रवारी सकाळी बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसले. आठ ते दहा ठसे लहान-मोठ्या आकाराचे आहेत. ही माहिती अड्याळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून पाऊलखुणांची पाहणी केली. तेव्हा सर्व ठसे बिबट्याचे असल्याचे निष्पन्न झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, क्षेत्रसहायक विनोद पंचभाई, रमेश कानसकर, सोनू निंबार्ते यावेळी उपस्थित होते. ग्रामस्थांनी रात्री-अपरात्री घराबाहेर फिरू नये, घरासमोर प्रकाश करावा, अशा सूचना देण्यात आल्या.

महिनाभरापूर्वी चकारा येथील पाटबंधारे विभागाच्या पडक्या इमारतीत बिबट्याचा बछडा आढळून आला होता. त्यानंतर सायंकाळी एक मादी बिबट त्या पिलाला तोंडात पकडून जंगलाच्या दिशेने नेत असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले होते. आता महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा चकारात बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

पथदिवे सुरू आहेत म्हणून...

पवनी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा २० दिवसांपासून खंडित आहे. त्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. परंतु चकारा येथील पथदिवे सुरू आहेत. आधीच वन्यप्राण्यांची, त्यातही बिबट्याची दहशत आणि गावात अंधार यामुळे नागरिक घाबरलेले आहेत. चकारा येथील पथदिवे सुरू असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. पथदिव्यावर तोडगा काढावा, अशी यानिमित्ताने मागणी आता पुढे येत आहे.

टॅग्स :leopardबिबट्या