बारव्हा (भंडारा) : पाण्याच्या शोधात असलेला बिबट्याचा विहिरीत पडून ठार झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील पारडी शेत शिवारात सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बिबट हा दोन वर्ष वयाचा असून तीन दिवसांपूर्वी विहिरीत पडला असल्याचे संशय आहे.
पारडी येथील हर्षवर्धन भोलानाथ दहिवले यांच्या शेतातील विहिरीतून सोमवारी सकाळी दुर्गंधी येत होती. त्यांनी विहिरीत बघितले असता बिबट मृतावस्थेत दिसून आला. याची माहिती तात्काळ वन विभागाला दिला. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. पंचनामा करून शवविच्येदनासाठी रवाना केले. जमिनीपासून विहिरीची कडा ही चार फूट उंच आहे. इथे बिबट्यानं पाणी पिण्यासाठी उडी मारली का? बिबट भक्ष्य पकडण्यासाठी धावला व पडला हा प्रश्न आहे. भंडाराचे उपवनसंरक्षक शिवाराम भलावी यांनी घटनास्थळाला भेट दिली.