इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा नगर पालिकेच्या शतकोत्तर सुणर्व महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी पाठ दाखविली. विशेष म्हणजे, कार्यक्रम सुरू झाल्यावर मंचावर बोलविल्यानंतरही नगरसेवक काही आले नाही. परिणामी पालिका पदाधिकाºयांमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा बाहेर आला आहे.भंडारा पालिकेला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शतकोत्तर सुणर्व महोत्सवानिमित्त ४ फेब्रुवारी ते २५ मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांंच्या हस्ते रविवारी करण्यात आला. तुमसर येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांचा ताफा ३.५९ वाजताच्या सुमारास खात रोड मार्गावरील रेल्वे लाईन मैदानातील कार्यक्रमस्थळी दाखल झाला. हारतुºयांचा कार्यक्रम सुरू होवूनही नगरसेवक काही कार्यक्रम स्थळी यायला तयार नव्हते. मुख्यमंत्री येण्यापूर्वीही नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी स्वत: नगरसेवकांची बातचीत केली. परंतू नगरसेवक आतमध्ये येण्यास तयार झाले नाही. मंचावरील अतिथींचे स्वागत करण्याचे सत्र सुरू असतानाच आमदार डॉ. परिणय फुके माईकवर येवून, ‘सुरक्षा कठड्याबाहेर उभे असलेल्या नगरसेवकांनी (भाजपचे) मंचावर यावे’ अशी विनंती केली. यानंतरही नगरसेवक मंचावर आले नसल्याने भरसभेत चर्चेला पेव फुटले. मुख्यमंत्री यांचे भाषण ४.२९ मिनिटांनी सुरू झाले. तब्बल १८ मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्र्याची नजर बाहेर उभे असलेल्या नगरसेवकांकडे आपसुकच गेली. मात्र तेही याबाबत काहीच बोलले नाीेहत. परंतू मंचकावरील अन्य नेते मंडळींचे चेहरे पाहण्यासाखे झाले होते.काय आहे नेमके कारण?मुख्यमंत्र्यांच्या सभेला येवूनही कठड्याबाहेर उभे असलेले नगर सेवकांमध्ये बहुतांश नगरसेवक हे पहिल्यांदाच भाजपक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. ‘‘शतकोत्तर सुणर्व महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही. नगराध्यक्ष व त्यांच्या मर्जीतल्या लोकांनीच हा कार्यक्रम ठरविल्यामुळे आम्ही नाराज आहोत. त्यातही आम्हा सर्व नगरसेवकांना मंचावर बसविण्यापेक्षा सर्वासोंबत बसण्याची व्यवस्था केली’’, अशी प्राजंळ कबुली यावेळी उपस्थित नगरसेवकांनी दिली. यावेळी भाजपचे नगरसेवक तथा सर्व सभापतींची उपस्थिती होती. यात यावेळी भाजपचे नगरसेवक आशु गोंडाणे, नितीन धकाते, कैलाश तांडेकर, राजू व्यास, दिनेश भुरे, रजनीश मिश्रा, जाबीर मालाधारी, मंगेश वंजारी, वनिता कुथे, साधना त्रिवेदी, गीता सिडाम, मधुरा मदनकर, शमीमा शेख, गिता सिडाम, भूमेश्वरी बोरकर, आशा उईके, ज्योती मोगरे, काँग्रेसच्या जयश्री बोरकर आदी नगरसेवक उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या सभेला नगरसेवकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 10:16 PM
भंडारा नगर पालिकेच्या शतकोत्तर सुणर्व महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी पाठ दाखविली.
ठळक मुद्देकठड्याबाहेर होते उभे : आवाहनानंतरही आले नाही मंचावर, शहरात चर्चेला उधाण