पालांदूर : उन्हाळी हंगामाचा आरंभ झालेला आहे. या उन्हाळी हंगामात धान पीक घेतले जाते. या धान पिकाच्या नर्सरीचे प्रात्यक्षिक देण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, कृषी सहायक शेखर निर्वाण यांच्या मार्गदर्शनात प्रगतिशील शेतकरी सुखराम मेश्राम वाकल यांच्या शेतात पार पडले.
उन्हाळीचे पऱ्हे डिसेंबर ते जानेवारी महिन्यात शेतकरीवर्ग घालतो. या वेळी थंडी अधिक असते. त्यामुळे पऱ्हे उगवणीवर परिणाम होतो. अपेक्षित उगवण न आल्यास रोवणीला अडचण होते. पर्यायाने रोवणीची समस्या वाढते. १० अंशापर्यंत तापमान खाली आल्यास पऱ्हे संकटात सापडतात. अशावेळी महागडी औषधे वापरून उत्पादनखर्चात भरीव वाढ होते.
या खर्चाला कात्री लागावी, नैसर्गिकरीत्या नर्सरीची जोमात वाढ व्हावी. याकरिता पाण्याचा निचरा होणारी नर्सरी अत्यंत महत्त्वाची असते. याकरिता गादी वाफ्यावर नर्सरी खूप महत्त्वाची असते. याकरिता मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांनी नर्सरी तयार करण्याची पद्धत, तिची लांबी-रुंदी, बियाणे टाकण्याची पद्धत, खताची मात्रा आदी शेतकरीवर्गाला समजून सांगत त्यांच्याकडून करून घेतले.
या प्रात्यक्षिक कार्यक्रमात प्रगतिशील शेतकरी प्रभाकर कडूकार, सुखराम मेश्राम, सुखदेव भुसारी, पुरुषोत्तम भुसारी, बळीराम बागडे, मोहन लांजेवार, धनपाल नंदूरकर, गोकुळ राऊत, दिलीप राऊत, थालीराम नंदूरकर आदी शेतकऱ्यांनी नर्सरीचा अभ्यास जाणून घेतला. मनातील शंकांना अधिकाऱ्यांच्या उत्तराने समाधान केले.
पऱ्ह्याची वाढ चांगली व्हावी याकरिता आधी जमीन भुसभुशीत करावी. शेणखत घालावे. सरी-वरंबे करीत गादी वाफ्याचा आधार बनवावा. पाण्याचा उत्तम निचरा होईल अशी रचना संपूर्ण नर्सरीची असावी.
बियाणे बीजप्रक्रिया केलेले असावे. शिफारशीनुसार जमिनीत रासायनिक खताची मात्रा द्यावी, नंतरच बियाण्यांची पेरणी करावी. शक्यतो सायंकाळच्या सुमारास पाणी द्यावे. अधिक थंडी जाणवल्यास व नर्सरी धोक्यात वाटल्यास कागदाचे झाकण देत नर्सरीचे संरक्षण करावे.
गणपती पांडेगावकर मंडळ कृषी अधिकारी पालांदूर.
कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात उन्हाळी धानाची नर्सरी सजविलेली आहे. यापूर्वी इतकी तंतोतंत नर्सरी तयार केलेली नव्हती. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेली धानाची पेरणी योग्य वाटली. यात बीजप्रक्रिया, गादीवाफा, गादीवाफ्याची रुंदी, नर्सरीचा उतार
कोट बॉक्स
संकटकालीन स्थितीत शून्य खर्चातील काही उपाय निश्चितच प्रेरणादायी वाटले. कृषी अधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाने निश्चितच आम्हाला नवा अभ्यास मिळाला.
सुखराम मेश्राम प्रगतिशील शेतकरी वाकल.