ब्रम्हानंद करंजेकर यांचे प्रतिपादन: विवेकानंद तंत्रनिकेतन येथे मार्गदर्शन मेळावालोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आजचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग असून तांत्रिक शिक्षण काळाची गरज आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना स्वरूचीने त्यांचे आवडते क्षेत्र निवडू देण्याची गरज आहे. आपली इच्छा पाल्यावर लादू नये. इयत्ता १० व १२ नंतर विद्यार्थ्यांच्या जीवनाचा "टर्निंग पाईन्ट" आहे तेव्हा योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिक्षण महर्षी डॉ.ब्रम्हानंद करंजेकर यांनी केले. स्वामी विवेकानंद तंत्रनिकेतन महाविद्यालय सीतासावंगी येथे आयोजित तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर सांबारे, गोबरवाहीचे ठाणेदार किशोर झोटींग, पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण गाढवे, सिंडीकेट बँक चिखलाचे शाखा व्यवस्थापक आशिष दुपारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक प्राचार्य नागेन्द्र डहरवाल यांनी केले. संचालन रहमतखान तर आभार सुरेश बेलुरकर यांनी मानले. संस्थेतर्फे अतिथींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मागील ३३ वर्षांपासून आदिवासी क्षेत्रातील या तंत्रनिकेतन महाविद्यालयात गरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, शेतकरी, शेतमजूरांच्या मुलांना शिक्षण देण्यात आले. संस्थेची स्थापना स्व. ए.के. हागरा, माजी आमदार राम लांजेवार, अर्जून लालवानी, दीनानाथ क्षिरसागर, वहीद खेमचंद जैन, गोविंदराव खोब्रागडे, बेनिप्रसाद गोयनकर, जी.एम. वलराज, माजी सरपंच पतिराम सरादे यांनी केली होती. संस्थेच्या प्रगतीत बी.एल. चौधरी, एस.एस. चक्रवर्ती, एच.आर. कलहारी, प्राचार्य नागेन्द्र डहरवाल यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालय प्रगतीवर आहे. याप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वयंस्फूर्तीने क्षेत्र निवडू द्यावे
By admin | Published: June 16, 2017 12:25 AM