शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

जीवनदायिनी चुलबंद नदीचे पात्र पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:51 AM

तालुक्यातील चुलबंद ही प्रमुख नदी आहे . लाखांदूर तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ही चुलबंदला ओळखले जाते. कारण पाण्यासाठी जास्तीत जास्त गावे या नदीवरच अवलंबून आहेत. पावसाळ्यात या नदीला भरपूर पूर असतो मात्र आजघडीला ती स्वत: तहानलेली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष । वीटभट्टी, टरबुज लागवड व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील चुलबंद ही प्रमुख नदी आहे . लाखांदूर तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ही चुलबंदला ओळखले जाते. कारण पाण्यासाठी जास्तीत जास्त गावे या नदीवरच अवलंबून आहेत. पावसाळ्यात या नदीला भरपूर पूर असतो मात्र आजघडीला ती स्वत: तहानलेली आहे.या नदीच्या काठावर तालुक्यातील चप्राड, असोला, भागडी, चिचोली, मांढळ, दांडेगाव, धमार्पुरी, कुंभली यांसारखी अनेक गावे आहेत. ही गावे नदीतील पाण्यावरच पिण्याच्या पाण्यासाठी, वापरासाठी, जनावरांसाठी तसेच सिंचनासाठी अवलंबून आहेत.या वर्षी पडलेला अपुरा पाऊस व प्रशासनामार्फत पाण्याचे नियोजन न केल्यामुळे ही नदी स्वत: तहानलेली आहे. नदी काठावरील मासेमारी बांधवांच्या व्यवसायावर कुºहाड चालली आहे. उन्हाळ्यात नदी पात्रात तरबूज यांची लागवड पाण्याअभावी कोलमडून पडली आहे तर विटा व्यवसाय थंड बस्त्यात आहे.या गावाच्या जवळील छोटी-मोठी खेडे सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी नदीकाठावरील गावावरच अवलंबून आहेत. मात्र नदीच तहानलेली असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.तालुक्यातील मडेघाट या गावात पिण्याचे पाणी लाखांदूर वरून येते मात्र लाखांदूरातच पाण्याची समस्या निर्माण झाल्याने मडेघाटचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मडेघाटातील लोक पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. अशीच समस्या तालुक्यातील अनेक गावांत दिसून येत आहे मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.नदीपात्रातील पाणी कमी असल्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे .त्यामुळे हातपंप , विहिरी यांना पाणी दिसेनासा झालाय. मात्र चुलबंद नदी पात्राच्या जवळच भंडारा जिल्ह्यात इंदिरासागर प्रकल्प तर गोंदिया जिल्ह्यात ईटीयाडोह या प्रकल्पांत भरपूर जलसाठा आहे. दोन्ही प्रकल्पांपासून लाखांदूर तालुक्यात कालवे काढले आहेत. मात्र अद्यापही तिथून पाणीपुरवठा सुरू केलेला नाही. जर या कालव्यांद्वारे चुलबंद नदीपात्रात पाणी आणले तर वाटेतील गावांची पाण्याची समस्या सुटू शकेल व चुलबंद नदीची सुद्धा तहान भागू शकेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.टँकरमुक्त जिल्हाभंडारा जिल्हा टँकरमुक्त जिल्हा म्हणून नोंद आहे. मात्र आजही जिल्ह्यातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मग टँकरमुक्त जिल्हा म्हणावे तरी कशाला, असा सवाल आपसुकच निर्माण होतो. सिंचन व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना त्रास तर होतोच शिवाय शुद्ध पाण्यासाठीही नागरिकांना भटकावे लागत आहे.पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. जिल्ह्यातील चुलबंद, सुर नदीचे पात्र दरवर्षी कोरडे पडले. तीन ते चार महिने पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होते. या दोन्ही उपनद्यांवर यथोचित ठिकाणी बंधारे बांधणे गरजचे आहे.-मो.सईद शेख, पर्यावरण तज्ज्ञ, भंडारा

टॅग्स :water shortageपाणीटंचाईriverनदी