शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जीवघेणी बेशिस्त

By admin | Published: February 03, 2015 10:50 PM

झपाट्याने विकसित होणाऱ्या भंडारा जीवघेण्या अपघाताचे प्रमाण सारखे वाढत आहे. जीवन अनमोल असल्याचे बेदरकार वाहनचालकांना मान्य नाही. दुसऱ्याच्या जीवाची त्यांना कदर नाही,

भंडारा : झपाट्याने विकसित होणाऱ्या भंडारा जीवघेण्या अपघाताचे प्रमाण सारखे वाढत आहे. जीवन अनमोल असल्याचे बेदरकार वाहनचालकांना मान्य नाही. दुसऱ्याच्या जीवाची त्यांना कदर नाही, त्यामुळेच लाखमोलाची माणसे रस्त्यांवर किड्या-मुंग्यांप्रमाणे चिरडली जात आहेत. मागील आठवड्यात बेला येथे एक विद्यार्थिनी असेच चिरडले गेले अन पुन्हा एकदा अपघाताचा भयावह विषय चर्चा आणि चिंता वाढवणारा ठरला आहे. राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढली, वाहने वाढली अन् दुर्दैवाने अपघातही वाढले. मागील वर्षभरात ४४१ अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये १४८ जणांचे बळी गेले आहेत. या अपघातातील मृत आणि जखमींची संख्या बघता शहरातील वाहतूक व्यवस्था किती बेशिस्त आहे. अन् वाहनचालक किती निर्ढावले आहेत त्याचा प्रत्यय येत आहे. त्यामुळे या शहरात आता मुख्य चौकांमध्ये वाहतूक सिग्नलची आवश्यकता बळावली आहे. (लोकमत चमू) असून नसल्यासारखेभंडारा शहरात लहान मोठे १५ ते २० चौक आहेत. यापैकी मुख्य मार्गांना जोडणारे सहा चौक आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत असावी आणि वाहनचालकांनी शिस्तीत वाहने चालवावी, यासाठी चौकाचौकात सिग्नल लावण्याची गरज आहे. परंतु एकाही चौकात सिग्नल नाहीत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांची तैनाती असते. मात्र, हे सारेच असून नसल्यासारखे आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चौकात उभे राहण्यासाठी लोखंडी चौकी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद चौक, जिल्हाधिकारी चौक आणि आणखी एखाद दुसऱ्या चौकातला अपवाद वगळता कोणत्याही सिग्नलवर पोलीस उभे दिसत नाहीत. ते उभे असतात सिग्नलपासून काही अंतरावर, एखाद्या झाडाच्या आडोशाला. चौकात ते दिसत नसल्यामुळे निर्ढावलेले वाहनचालक भरधावपणे वाहन दामटतात. या बेशिस्त वाहनचालकामुळे दुसऱ्याच वाहनचालकाला धोका होतो अन् भलत्याच्याच जीवावर बेतते. सारेच धक्कादायक येथील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र वाहतूक शाखा आहे. मात्र, ती खिळखिळी आहे. शहरातील चौकांचा आणि सिग्नलचा विचार केल्यास किमान १०० पोलीस कर्मचाऱ्यांची वाहतूक शाखेला गरज आहे. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिसांची संख्या केवळ ५० आहे. त्यांना सांभाळण्यासाठी एक पीआय आणि एक पीएसआय आहेत. आजारी आणि साप्ताहिक रजा अन् अन्य संबंधित कारणे लक्षात घेतल्यास यापैकी रोज केवळ ४० पोलीस प्रत्यक्ष कर्तव्यावर असतात. वाहतूक नियंत्रित करण्यासोबतच शहरात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची (व्हीव्हीआयपींची) वाट मोकळी करून देण्याचीही जबाबदारी याच पोलिसांना सांभाळावी लागते. बेभान होऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांची संख्या अन् उपद्रव वाढत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांजवळ एकही गती मोजणारे उपकरण नाही, ही सर्वात धक्कादायक बाब आहे.